Video : औरंगाबादेत कोरोना प्रतिबंधक पथकातील कर्मचाऱ्यांनाच व्यापाऱ्यांकडून मारहाण!

कारवाईसाठी गेलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादेत घडला आहे.

Video : औरंगाबादेत कोरोना प्रतिबंधक पथकातील कर्मचाऱ्यांनाच व्यापाऱ्यांकडून मारहाण!
औरंगाबाद जिल्ह्यात बुधवारी दिवसभऱात कोरोनाच्या 371 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 51, 287 वर जाऊन पोहोचला आहे.
Follow us
| Updated on: Mar 01, 2021 | 11:29 PM

औरंगाबाद : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाने निर्बंध अधिक कडक केले आहेत. अशावेळी औरंगाबादेत सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. मात्र, कारवाईसाठी गेलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादेत घडला आहे.(Corona Prevention Squad personnel beaten in Aurangabad)

औरंगाबादेतील गुलमंडी परिसरात विमामास्क फिरणाऱ्या लोकांवर कारवाईसाठी महापालिकेचं कोरोना प्रतिबंधक पथक गेलं होतं. त्यावेळी एका माजी नगरसेवकासह काही व्यापाऱ्यांनी या पथकातील कर्मचाऱ्यांनाच मारहाण केली आहे. हे पथक बाजारात विनामास्क फिरणाऱ्या ग्राहकांवर कारवाई करण्यात येत होती. त्यावेळी काही व्यापाऱ्यांनी पथकातील कर्मचाऱ्यांना मारहाण केली. या प्रकरणात दोन्ही बाजूंकडून क्रांती चौक पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी करण्यात आल्या आहेत.

14 मार्चपर्यंत नाईट कर्फ्यू

औरंगाबादेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झालं आहे. रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ही संचारबंदी 14 मार्चपर्यंत असणार आहे. संचारबंदीच्या कालावधीत उद्योग आणि आरोग्य व्यवसाय वगळता बाकी सगळं बंद राहणार आहे. याबाबतचा निर्णय नागपूर महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांच्या आजच्या बैठकीत घेण्यात आला.

प्रशासनाच्या धडाडीच्या कारवाया आणि निर्णयाची अंमलबजावणी

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने या आठवड्यात अनेक धडाडीच्या कारवाया केल्या. तसेच अनेक महत्त्वाच्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यात आली. यापुढेदेखील अत्यंत शिस्तबद्धपद्धतीने नियमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

औरंगाबादेतील कोरोना स्थिती

औरंगाबादेत रविवारी 256 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे औरंगाबादेतील कोरोना रुग्णांचा आकडा 50 हजार 366 वर पोहोचला आहे. सध्या रुग्णालयात 2 हजार 100 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर रविवारी 2 रुग्णांचा मृत्यू झालाय.

संबंधित बातम्या :

औरंगाबादमध्ये प्रशासनाचं मोठं पाऊल, 14 मार्चपर्यंत नाईट कर्फ्यू

एकाच शाळेतील 40 विद्यार्थ्यांना कोरोना, 320 विद्यार्थी, 10 शिक्षक, 20 कर्मचारी क्वारंटाईन, महाराष्ट्राला हादरे सुरुच

आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्याने टेन्शन वाढवलं?, शाळा, कॉलेज, आठवडी बाजार 31 मार्चपर्यंत बंद!

Corona Prevention Squad personnel beaten in Aurangabad

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.