मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर हॉटेल, बार, रेस्टॉरंट्स, मॉल्स काही निर्बंधांसह सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, सिनेमागृह आणि नाट्यगृह सुरु करण्याचा निर्णय अद्याप घेण्यात आला नव्हता. मात्र, आता 50 टक्क्यांच्या मर्यादेसह 5 नोव्हेंबरपासून नाट्यगृह सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. नाट्यक्षेत्रातील काही मान्यवर कलाकारांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी नाट्यगृह सुरु करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी 5 नोव्हेंबरपासून नाट्यगृहे सुरु करण्यास परवानगी दिली आहे. तसा आदेश संबंधित सगळ्या शासकीय अधिकारी आणि विभागांना ताबडतोब देण्यात आला आहे. (CM Uddhav Thackeray has given permission to start theaters)