Maharashtra Corona Update : मुलांच्या लसीकरणाला सुरुवात; वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आज महत्त्वाची बैठक

इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना लस देण्याबाबतच्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी आज सर्व संबंधितांची तातडीची बैठक आयोजित केली आहे.

Maharashtra Corona Update : मुलांच्या लसीकरणाला सुरुवात; वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आज महत्त्वाची बैठक
वर्षा गायकवाड
Follow us
| Updated on: Jan 03, 2022 | 7:23 AM

मुंबई : कोविड-19 ला प्रतिबंध करण्यासाठी आता 15 ते 18 वयोगटातील तरूणांना लस देण्यास मान्यता मिळाली आहे. याअनुषंगाने इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना (Students) लस (Corona Vaccine) देण्याबाबतच्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी 3 जानेवारी रोजी म्हणजेच आज सर्व संबंधितांची तातडीची बैठक आयोजित केली आहे. कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांचे 100 टक्के लसीकरण होणे गरजेचे आहे. राज्य शासन यासाठी सर्व पातळीवर प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांच्या लसीकरणाबाबत शालेय शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. त्याचा प्रा.वर्षा गायकवाड या बैठकीत आढावा घेतील.

या बैठकीस शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिवांसह शिक्षण आयुक्त, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, महानगरपालिका/नगरपालिकेचे शिक्षणाधिकारी/ प्रशासन अधिकारी, गट शिक्षणाधिकारी ऑनलाइन उपस्थित राहणार आहेत.

उद्यापासून मुंबईत 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण

कोरोनाचा फैलाव वाढत आहे आणि कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनने देखील देशात शिरकाव केलाय. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लहना मुलांच्या लसीकरणाची घोषणा केली होती. पंतप्रधानांनी केलेल्या घोषणेनुसार उद्यापासून मुंबईमध्ये 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होत आहे. लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेची तयारी पूर्ण झाली असून, उद्यापासून मुंबईत 9 लसीकरण केंद्रांवर मुलांच्या लसीकरणाची सोय करण्यात आली आहे.

महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्राधान्याने लसीकरण

सुरुवातीला मुंबई महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठीचे नियोजन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने बसमधून लसीकरणासाठी केंद्रावर आणण्यात येणार आहे. लस दिल्यानंतर पुन्हा त्यांना शाळेत सोडण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. तसेच इतर खासगी शाळेतील विद्यार्थ्यांना देखील कोरोनाची लस देण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी किंवा आपल्या जवळच्या लसीकरण केंद्रात जाऊन लस घ्यावी असे आवाहन मुंबई महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

इतर बातम्या :

धनूभाऊंचा पंकजाताईंना मेसेज! कोरोना पॉझिटिव्ह बहिणीचा धनुभाऊंना काय रिप्लाय?

Omicron Variant : चिंता वाढली, राज्यात ओमिक्रॉनचे 50 नवे रुग्ण, एकट्या पुण्यात 36 रुग्णांची नोंद

Non Stop LIVE Update
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.