चिंता वाढतेय, नियम पाळा..! राज्यातील ‘या’ जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये वाढ

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या हळूहळू वाढू लागली आहे. Corona virus cases increased

चिंता वाढतेय, नियम पाळा..! राज्यातील 'या' जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये वाढ
कोरोना संसर्ग वाढतोय

मुंबई: केंद्र सरकारनं  कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम सुरु केला आहे. महाराष्ट्रातही पहिल्या टप्प्यामधील कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम सुरु आहे. मात्र, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या हळूहळू वाढू लागली आहे. यवतमाळ, अकोला, अमरावती या जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्ण वाढत असल्याचं दिसून येत आहे. नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर करणं गरजेचे झालं आहे. (Corona virus cases increased in Yavatmal Akola Amravati)

यवतमाळ जिल्ह्यात पंधरा दिवसात 1706 कोरोना रुग्ण

यवतमाळ जिल्ह्यात गेल्या काही दिवसात कोरोनाच्या रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर पाहिजे त्या पद्धतीने नागरिकांनी काळजी न घेतल्याने ही रुग्णाची संख्या वाढत असल्याचे बोलले जात आहे. यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 14 हजार 842 एकूण पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद झाली असून 434 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. गेल्या पंधरा दिवसातील आकडेवारी जर बघितली तर जिल्ह्यात 1706 पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले आहेत. त्यातील 25 जणांचा गेल्या पंधरा दिवसात मृत्यू झाला आहे. त्यात सर्वाधिक मृत्यूचे प्रमाण हे यवतमाळ शहर तालुका भागातील आहे.

अनलॉक फेज मध्ये नागरिकांनी कुठलीही काळजी न घेतल्याने आणि शाळा, हॉटेल, लग्न प्रसंग , समारंभ यातून जास्त लागण नागरिकांना झाल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार यांनी सांगितले. कोरोनाची लस आली आहे आता कोणतीही खबरदारी घ्यावी लागणार नाही. या अविर्भावाने ही रुग्ण वाढले असल्याचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी सांगतात. यवतमाळ शहरासह जिल्हाभरात गेल्या 15 दिवसात रुग्ण संख्या वाढल्याने प्रशासनानसह आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाने मास्क लावणे, सोशल डिस्टनसिंग बाबत कठोर कारवाई केली तरच नागरिक नियम पाळतील अन्यथा आणखी रुग्ण संख्या वाढण्याची भीती आहे.

अकोल्यात गेल्या 15 दिवसात 402 रुग्णांची वाढ

अकोला जिल्हात गेल्या पंधरा दिवसात झपाट्याने रुग्णांमध्ये वाढ झालेली आहे. 24 जानेवारी ते 8 फेब्रुवारी पर्यंत 402 रुग्णांची नोंद झाली असून यामध्ये मृत्यू दर कमी झालाय. परंतु कोविड – 19 च्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ दिसून येत आहे. त्यासाठी प्रशासन उपाय योजना करत आहे. पण, जिल्हातील नागरिक कोरोनाला गांभीर्याने घेताना दिसून येत नाहीत. कोरोनाचे नियम धाब्यावर ठेवून सर्रासपणे नागरीक फिरतांना दिसून येत आहेत. अकोला जिल्हात रुग्ण वाढण्याचे कारण शाळा सुरू झाल्यामुळे,ग्राम पंचायत निवडणूक,तोंडाला मास्क न वापरणे,जे पॉझिटिव्ह रुग्ण आहेत ते घरात न राहता सर्रास पणे बाहेर फिरतात. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांत मोठ्या झपाट्याने वाढ होत आहे.

अमरावतीमध्ये दररोज 100 पेक्षा जास्त कोरोना रुग्ण

अमरावती जिल्हात गेल्या आठवड्याभरापासून कोरोना रुग्ण संख्या ही झपाट्याने वाढत असल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे. अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना संदर्भात बैठक घेतली. यावेळी त्यांनी वाढती कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेता चिंता व्यक्त करत कोरोना नियम आता यापुढे सक्तीने पाळावे लागतील, अन्यथा कारवाईला सामोरं जावं लागतील असा इशारा यशोमती ठाकूर यांनी दिला. तर, पुन्हा लॉकडाऊनला सामोरं जायचं नाही त्यामुळे नियम पाळा असेही त्यांनी सांगितले.

यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या सह अधिकारी वर्गांची बैठक घेऊन योग्य त्या सूचना प्रशासनाला दिल्या.कोरोनाची लाट पुढे येऊ नये यासाठी कोरोना नियम पाशा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. अमरावती जिल्हात दररोज 100 च्यावर रुग्ण वाढत आहेत.तर,सोमवारी तब्बल235 रुग्ण वाढले होते. जिल्हात आतापर्यंत 23293 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांती नों द झाली असून आतापर्यंत 22261 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर,423 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे

संबंधित बातम्या:

Corona | दिलासादायक…27 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात अ‌ॅक्टिव्ह केसेस 15 हजारांपेक्षा कमी

छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधून भाजपची ‘एक्झिट’?

(Corona virus cases increased in Yavatmal Akola Amravati)

Published On - 7:06 pm, Tue, 9 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI