Corona | दिलासादायक…27 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात अ‌ॅक्टिव्ह केसेस 15 हजारांपेक्षा कमी

देशांतील 27 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 15 हजारांपेक्षा कमी सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. ( Corona virus active cases less than 15 thousand in 27 States and UT)

Corona | दिलासादायक...27 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात अ‌ॅक्टिव्ह केसेस 15 हजारांपेक्षा कमी
शाहीना प्रधान यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणू संपूर्ण शरीरात फिरत आहे. ब्रिटनमधील अँगलिया रस्किन विद्यापीठाच्या संशोधकांनी कोरोना पॉझिटिव्ह लोकांवर एक विशेष सर्वेक्षण केलं आणि त्यांच्या लक्षणांबद्दल माहिती घेतली.

नवी दिल्ली : भारतातील कोरोना रुग्णांची संख्या 97 लाख 3 हजार 770 झाली आहे.तर, आतापर्यंत 91 लाख 78 हजार 946 (94.59%) जण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात सध्या 3 लाख 83 हजार 866 (3.96%)सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 40 हजार 958 (1.45 %) झाली आहे. 27 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 15 हजारांपेक्षा कमी सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.  ( Corona virus active cases less than 15 thousand in 27 States and UT)

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशातील 27 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये कोरोना ससंर्ग आणि अ‌ॅक्टिव रुग्ण कमी प्रमाणात आहेत. यामध्ये मिझोरम,पाँडिचेरी, सिक्कीम, त्रिपुरा, आसाम, जम्मू काश्मीर, उत्तराखंड, बिहार, आंध्रप्रदेश, तेलंगणा, गोवा, पंजाब, हिमाचल प्रदेश, तामिळनाडू, हरियाणा, मध्यप्रदेश आणि गुजरातचा समावेश आहे.

महाराष्ट्र
महाराष्ट्रात सोमवारी (7 डिसेंबर)ला 3075 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. सोमवारी 7345 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील 17 लाख 30 हजार 715 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात एकूण 75767 अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.98% झाले आहे.

दिल्लीतील परिस्थिती समाधानकारक

दिल्लीत ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात आणि नोव्हेंबरच्या पहिल्या काही दिवसांमध्ये कोरोना संसर्ग वाढला होता. आता दिल्लीतील कोरोनाची परिस्थिती समाधानकारक आहे. दिल्लीतील कोरोनातून बरे होण्याचा दर 94 टक्केंवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासात 1674 कोरोना रुग्ण आढळले तर 63 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ( Corona virus active cases less than 15 thousand in 27 States and UT)

हरियाणा
देशातील उत्तरेकडील राज्य हरियाणामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2 लाख 45 हजार 288 झाली आहे. हरियाणात आतापर्यंत 2 हजार 611 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. हरियाणात कोरोनामुक्त होण्याचा दर 93.99 वर पोहोचला आहे.

मध्य प्रदेश
मध्य प्रदेशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2 लाख 15 हजार 957 वर पोहोचली आहे. राज्यात कोरोनामुळं मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 3 हजार 347 झालीय.

झारखंड
झारखंड राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 लाख 10 हजार 457 वर पोहोचलीय. झारखंडमध्ये 988 जण कोरोनामुळे दगावले आहेत. आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार 1 लाख 7 हजार 710 जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.

संबंधित बातम्या:

Study | कोरोनाचा लैंगिक क्षमतेवर परिणाम, पुरुषांना होतोय ‘हा’ आजार

टेन्शन दूर, कोरोना रुग्णांची संख्या 16 टक्क्यांनी घटली; दुसऱ्या लाटेची शक्यता नाही

‘कोविशील्ड’ लस भारतासाठी किती प्रभावी? उपयुक्तता ते किंमत, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर

( Corona virus active cases less than 15 thousand in 27 States and UT)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI