टेन्शन दूर, कोरोना रुग्णांची संख्या 16 टक्क्यांनी घटली; दुसऱ्या लाटेची शक्यता नाही

दिवाळीनंतर देशभरात कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात राहिली असून या आठवड्यात तर रुग्णसंख्येत 16 टक्क्याने घट झाल्याने रुग्णसंख्येत घट होण्याचं प्रमाण 62 टक्क्यावर आलं आहे. (Corona cases drop by about 16 percent in the country this week, no sign of second wave )

टेन्शन दूर, कोरोना रुग्णांची संख्या 16 टक्क्यांनी घटली; दुसऱ्या लाटेची शक्यता नाही
यूकेच्या भारतीय वंशाच्या प्राध्यापक शाहीना प्रधान यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या अभ्यासात ही माहिती समोर आली आहे.
Follow us
| Updated on: Dec 07, 2020 | 11:44 AM

नवी दिल्ली: दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येऊन देशात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, दिवाळीनंतर देशभरात कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात राहिली असून या आठवड्यात तर रुग्णसंख्येत 16 टक्क्याने घट झाल्याने रुग्णसंख्येत घट होण्याचं प्रमाण 62 टक्क्यावर आलं आहे. त्यामुळे देशात कोरोनाची लाट येण्याची शक्यता नसल्याचं सांगण्यात येत असून देशवासियांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. (Corona cases drop by about 16 percent in the country this week, no sign of second wave )

देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट झाली असली तरी कोरोना मृत्यूंच्या संख्येत काहीही बदल झालेला दिसत नाही. गेल्या चार आठवड्यात कोरोनामुळे 3500 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठवड्यात म्हणजे 29 नोव्हेंबर ते 6 डिसेंबरपर्यंत 3539 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 13 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर या कालावधीत 8175 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे कोरोना बळींच्या संख्येत केवळ 58 टक्क्यांनी घट झाली आहे.

या आठवड्यात किती रुग्ण?

या आठवड्यात देशात कोरोनाचे 2,45,599 नवीन रुग्ण सापडले आहेत. गेल्या आठवड्यात 22 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर दरम्यान देशात कोरोनाचे 2,91,903 रुग्ण सापडले होते. या आठवड्यात गेल्या चार आठवड्यांपेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत. नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट व्हायला सुरुवात झाली असून देशात कोरोनाची लाट येण्याची कोणतीच शक्यता नसल्याचंही आढळून आलं आहे. राज्यांमध्येही कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे.

12 आठवड्यांपासून रुग्णसंख्या घटतेय

मधला एक आठवडा वगळता गेल्या 12 आठवड्यांपासून देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. सक्रिया कोरोना रुग्णांच्या संख्येतही मोठी घट झाल्याचं दिसून येत आहे. पहिल्यांदाच गेल्या 139 दिवसांत कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 4 लाखाहून कमी झाली आहे.

सध्या रुग्णसंख्या किती?

  • देशात सध्या कोरोनाचे एकूण 96 लाख 77 हजार 203 रुग्ण आहेत.
  • देशात कोरनाने आतापर्यंत 1,40,573 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
  • गेल्या 24 तासांत 39,109 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
  • त्यामुळे देशातील करोनामुक्त झालेल्यांची संख्या 91,39,901 वर पोहोचली आहे.
  • देशात गेल्या २४ तासांत 1,40,573 रुग्ण सापडले असून 391 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (Corona cases drop by about 16 percent in the country this week, no sign of second wave )

संबंधित बातम्या:

सीरमनेही मागितली लसीच्या आपत्कालीन वापराची परवानगी, ठरली पहिली भारतीय कंपनी

लहान मुलांवर कोरोना लसीची चाचणी नाही, दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागणार?

Corona | मास्क वापरा अन्यथा होणार खुल्या तरुंगात रवानगी, शिक्षाही ठरली

(Corona cases drop by about 16 percent in the country this week, no sign of second wave )

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.