Corona | मास्क वापरा अन्यथा होणार खुल्या तरुंगात रवानगी, शिक्षाही ठरली

विनामास्क आढळल्यास संबंधितांची थेट खुल्या कारागृहात रवानगी होणार आहे, आतापर्यंत 20 जणांची ही शिक्षा झालीय. For not wearing mask punishment is open jail

Corona | मास्क वापरा अन्यथा होणार खुल्या तरुंगात रवानगी, शिक्षाही ठरली
Follow us
| Updated on: Dec 06, 2020 | 1:54 PM

भोपाळ : भारतातील कोरोनाबाधितांची संख्या 96 लाख 44 हजार 222 वर पोहोचली आहे. तर 91 लाख 792 नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत. देशात सध्या 4 लाख 3 हजार 248 सक्रियी ररुग्णांवर उपचार सुरु आहेत. कोरोनामुळं 1 लाख 40 हजार 182 जणांचा कोरोनामुळं मृत्यू होऊनही अनेकांना कोरोना संसर्गाचं गांभीर्य समजलेले नाही. त्यामुळं प्रशासनानं वारंवार आवाहन करुनही नागरिक मास्क वापरताना दिसत नाहीत. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर शहरात मास्क न वापरता कोणी आढळून आल्यास त्याला अनोखी शिक्षा करण्यात येणार आहे. विनामास्क आढळल्यास संबंधितांची थेट खुल्या कारागृहात रवानगी होणार आहे. यासोबतच्या त्या व्यक्तीला कोरोना महामारीवर निंबध लिहावा लागणार आहे. (For not wearing mask punishment is open jail and essay on corona)

ग्वाल्हेरचे जिल्हाधिकारी कौशलेंद्र विक्रम सिंह यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विशेष अभियान राबवले आहे. कोरोना विषयक जनजागृती करण्यासाोबतच विनामास्क आढळणाऱ्यांची रवानगी थेट खुल्या कारागृहात केली जाणार आहे. शनिवारी 20 नागरिकांना रुपसिंह स्टेडियममधील खुल्या तुरुंगात पाठवण्यात आलं, त्यांच्याकडून कोरोनाविषयी निबंध लिहून घेण्यात आला.

विनामस्क फिरणाऱ्यांमध्ये युवकांची मोठी संख्या

नागरिक सोशल डिस्टन्सिंगचे पालन करताना दिसत नाहीत आणि त्यासोबत मास्क न वापरता फिरताना दिसून येत आहेत. विनामास्क फिरणाऱ्यांमध्ये युवकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. काही नागरिक मास्क व्यवस्थित लावता गळ्यात अडकवून फिरत होते. यामुळे ग्वाल्हेरमध्ये अशा स्वरुपाचा निर्णय घेण्यात आला आहे. (For not wearing mask punishment is open jail and essay on corona)

ग्वाल्हेरच्या महिला आणि बाल विकास अधिकारी राजीव सिंह यांनी रुपसिंह स्टेडियममध्ये खुला तुरुंग निर्माण करण्यात आल्याची माहिती दिली आहे. शनिवारी 20 तरुणांना स्टेडियममध्ये खुल्या तुरुंगात ठेवण्यात आले आणि त्यांच्याकडून निबंध लिहून घेण्यात आला.

मध्य प्रदेशात कोरोनाबाधितांची संख्या 2 लाखांवर

मध्य प्रदेशात कोरोनाबाधित रुगणांची संख्या 2 लाख 13 हजारांवर पोहोचली आहे. त्यापैकी 1 लाख 96 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, 3 हजार 326 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. (For not wearing mask punishment is open jail and essay on corona)

फायजरने लसीच्या वापरासाठी भारताकडे मागितली परवानगी

युनायटेड किंगडमने (United Kingdom) त्यांच्या देशात अमेरीकन औषध निर्माती कंपनी फायझर-बायोएनटेकच्या कोरोना लसीला नुकतीच मंजुरी दिली आहे. कोरोना लसीला मान्यता देणारा यूके हा पहिलाच पाश्चिमात्य देश ठरला आहे. फायझर कंपनीने त्यांच्या कोरोना लसीचा भारतात आपत्कालीन वापर करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे.

या लसीचा साठा (स्टोरेज) करुन ठेवणं हे भारतासमोरचं सर्वात मोठं आव्हान आहे, कारण ही लस -70 अंश सेल्सिअस तापमान असलेल्या ठिकाणी ठेवावी लागेल. थोड्या प्रमाणात ही लस साठवणे सोपे आहे. परंतु मोठ्या प्रमाणात या लसीचा साठा करुन ठेवणे सध्या तरी आपल्यासाठी अवघड आहे. तसेच आपण तसा प्रयत्न केला तरी त्यासाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जा आणि पैसे खर्च होणार आहेत.

संबंधित बातम्या :

अनेक देशांत मंजूरी मिळालेल्या Pfizer च्या कोरोनावरील लसीची काय आहे किंमत आणि वैशिष्ट्ये?

Corona Vaccine | ‘या’ देशातील नागरिकांना मोफत कोरोना लस मिळणार, पाकिस्तानचाही समावेश

(For not wearing mask punishment is open jail and essay on corona)

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.