पुण्यातील दोघांना कोरोनाची लागण, तातडीने उपचार सुरु

पुण्यातील दोघांना कोरोनाची लागण, तातडीने उपचार सुरु

महाराष्ट्रातही कोरोनाने शिरकाव केला आहे. महाराष्ट्रातील पहिला रुग्ण पुण्यात आढळला आहे. पुण्यात कोरोनाचे 2 रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. (Corona patient found in Pune)

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सचिन पाटील

Mar 10, 2020 | 10:39 AM

पुणे : जगभरात कोरोना संसर्गाचं थैमान सुरु असताना याच्या थेट झळा भारतालाही बसल्या आहेत (Corona patient found in Pune). देशभरात 40 हून अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. आता महाराष्ट्रातही कोरोनाने शिरकाव केला आहे. महाराष्ट्रातील पहिला रुग्ण पुण्यात आढळला आहे. पुण्यात कोरोनाचे 2 रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. संबंधित रुग्ण नुकतेच दुबईला जाऊन आल्याचीही माहिती मिळत आहे.

दुबईहून आलेल्या या रुग्णांना तातडीने नायडू हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. त्यांना विलगीकरण कक्षामध्ये दाखल करुन तातडीने उपचार सुरु करण्यात आले आहेत. दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. त्यापैकी एका रुग्णामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून येत आहेत. दुसऱ्या रुग्णामध्ये अद्याप लक्षणे आढळून आलेली नाहीत. सदर रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची माहितीही घेतली जात आहे. या रुग्णांवर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे.

आरोग्य प्रशासनाने नागरिकांना घाबरण्याचं कारण नसल्याचं स्पष्ट केलं आहे. होळी, धुळवड, तुकाराम बीज, गावोगाव भरणाऱ्या यात्रा आणि उरुसांच्या पार्श्वभूमीवर गर्दीची ठिकाणे टाळण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. होळी सण आपल्या कुटुंबीयांसोबतच साजरा करण्याचं आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसकर आणि पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.

“रुग्णांच्या संपर्कात आलेले लोकही तातडीने विलिनीकरण कक्षात”

यावर बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, “मी आजच महाराष्ट्रात एकही कोरोना रुग्ण नसल्याचं म्हटलं होतं. मात्र, माझ्या मुलाखतीनंतर तासाभरातच मला पुण्यातील कोरोना रुग्णांची माहिती मिळाली. हे दोन रुग्ण पती-पत्नी आहेत. ते वीणा ट्रॅव्हल्सने 1 मार्चला दुबईवरुन आले होते. आज 6 मार्चपर्यंत त्यांना कोणतेही लक्षणं दिसली नाहीत. मात्र, पत्नीला कोरोनाची लक्षणं जाणवायला लागले. म्हणून त्यांनी तपासणी केली. दोघांचीही रक्त तपासणी केली असता, ते कोरोना पॉझिटीव्ह निघाले. यानंतर तातडीने त्यांना विलगीकरण कक्षात उपचार सुरु केले आहेत.”

संबंधित रुग्णांच्या संपर्कात जे लोक आले आहेत, त्यांचीही माहिती घेतली जात आहे. ते ज्या गाडीने आले, ज्या ऑफिसमध्ये गेले तेथील कर्मचारी, वीणा वर्ल्डमध्ये जे लोक त्यांच्यासोबत होते ते, अशा सर्वांना तातडीने विलगीकरण कक्षात ठेवले जाणार आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेऊन आपण सर्वांनी ज्या यंत्रणा तयार ठेवल्या होत्या त्याचा उपयोग करुन कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. उपचार सुरु आहेत. घाबरण्यासारखं काहीही नाही, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

Corona Virus: पुण्यातील दोघांना कोरोनाची लागण, तातडीने उपचार सुरु

Corona patient found in Pune

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें