AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

किती वाईट आहे? सरकारचा हमीभाव फक्त कागदावरच? जळगावात कापूस उत्पादक शेतकरी रडकुंडीला

जळगावच्या बोदवड येथील कापूस शेतकऱ्यांना केंद्र सरकारने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. व्यापारी हमीभावापेक्षा कमी किंमतीत कापूस खरेदी करीत आहेत. शेतकऱ्यांना सरासरी ७००० रुपये प्रति क्विंटलपेक्षा कमी भाव मिळत आहे, तर हमीभाव ७१२१ ते ७५२१ रुपये आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

किती वाईट आहे? सरकारचा हमीभाव फक्त कागदावरच? जळगावात कापूस उत्पादक शेतकरी रडकुंडीला
सरकारचा हमीभाव फक्त कागदावरच? जळगावात कापूस उत्पादक शेतकरी रडकुंडीला
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Nov 26, 2024 | 5:54 PM
Share

शेतकऱ्याचं पांढर सोनं म्हणजे कापूस. केंद्र सरकारने कापसाचा हमीभाव वाढवल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. पण जळगावच्या बोदवड येथील शेतकऱ्यांना हमीभावापेक्षाही कमी पैसे मिळत असल्याचं समोर आलं आहे. इथे व्यापाऱ्यांकडून हमीभावापेक्षाही कमी पैशात कापूस शेतकऱ्यांकडून खरेदी केला जातोय. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकरी शेतात राबराब राबतो. आसमानी संकटांना सामोरं जात काबाडकष्ट करतो. पण जेव्हा कापूस घरात येतो तेव्हा त्या शेतकऱ्याला हमीभाव सुद्धा न मिळणं यापेक्षा दुर्देवी गोष्ट कोणतीच असू शकत नाही. अशा प्रकारे मुजोरपणे शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या व्यापाऱ्यांवर सरकारचा अंकुश नाही का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.

शेतकरी हा खरंतर जगाचा पोशिंदा मानला जातो. पण याच जगाच्या पोशिंद्याला हमीभावा इतका देखील भाव त्याच्या कापसाला मिळत नसेल तर यापेक्षा दुर्दैव गोष्ट कोणतीच असू शकत नाही. एक जबाबदारी, सुजाण नागरीक म्हणून तरी शेतकऱ्याला हमीभाव मिळवून देणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे केंद्र सरकार शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या अशा लुबाडणूकपासून सुटका करेल, अशी आशा आहे.

शेतकऱ्यांना नेमका काय भाव मिळतोय?

सरासरी एक ते दीड वर्षापासून कापसाचे दर प्रति क्विंटल 7 हजारांच्या पुढे गेलेले नाही. केंद्र सरकारने २०२४-२५ या वर्षासाठी कपाशीच्या हमीभावात ५०९ रुपयांची वाढ केली आहे. त्यानुसार सीसीआयने चालू हंगामात मध्यम धाग्याच्या कापसासाठी ७ हजार १२१ रुपये आणि लांब धाग्याच्या कापसाला ७ हजार ५२१ रुपये हमीभाव जाहीर केला. पण व्यापारी हमीभावापेक्षा कमी बोली लावत असल्याने शेतकरी रडकुंडीला आला आहे. सन २०१३ मध्ये कापसाला प्रति क्विंटल ७ हजार ५०० रुपये दर मिळत होता. आताही केवळ ६ ते ७ हजार रुपये प्रति क्विंटल या दराने कापूस खरेदी केला जातो आहे.

कपाशीचे भाव वाढतील या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक केली. पण शेतकऱ्यांना पैशांची गरज असल्यामुळे त्यांना नाईलाजास्तव कापूस विकावा लागतो आहे. व्यापारी मनमानी करून वाट्टेल त्या भावात कापूस खरेदी करत आहेत. केंद्राकडून चालू हंगामात मध्यम धाग्याच्या कापसासाठी ७ हजार १२१ रुपये आणि लांब धाग्याच्या कापसासाठी ७ हजार ५२१ रुपये हमीभाव जाहीर झाला. खासगी व्यापारी ६,५०० ते ६,९०० रुपये प्रति क्विंटल भाव देत असल्याने नुकसान होते आहे. इतर शेतमालाचे दरही हमी भावापेक्षा खासगी बाजारात कमी असून हमी भावावर शासनाचा किती अंकुश आहे? याचा प्रत्यय शेतकऱ्यांना येतो आहे.

Follow Us
ही वादळापूर्वीची शांतता, नंतर... उद्धव ठाकरे एका वाक्यातच म्हणाले
ही वादळापूर्वीची शांतता, नंतर... उद्धव ठाकरेंनी एका वाक्यातच दिली कोर्टातील सुनावणीबाबत मोठी प्रतिक्रिया
आयुष्यात कोणताही ठराविक कोर्स... PM मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र
PM Narendra Modi Live: आयुष्यात कोणताही ठराविक कोर्स... IIT दिल्लीत पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र
उमेश पाटलांच्या एका पोस्टने वाढवलं राष्ट्रवादीचं टेन्शन
Umesh Patil on NCP | दादांनी उभ्या केलेल्या पक्षाच्या फांदीवर कुऱ्हाड चालवण्यात...; उमेश पाटलांच्या एका पोस्टने वाढवलं राष्ट्रवादीचं टेन्शन
शरद पवार गटाची मोठी खेळी? सुळे यांच्या नेतृत्वात सर्व खासदार...
मोठी बातमी! शरद पवार गटाची मोठी खेळी? सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात सर्व खासदार पंतप्रधानांच्या भेटीला; घेणार मोठा निर्णय!
दिलगीरी ट्वीट नंतर मी सुनेत्रा पवार यांच्याशी संपर्क करण्याचा...
Harshwardhan Sapkal | दिलगीरी ट्वीट नंतर मी सुनेत्रा पवार यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र... सपकाळ नेमकं काय म्हणाले?
प्रदेशाध्यक्ष बदलावा ही अजितदादांचीच इच्छा होती...
Rupali Thombre Patil | प्रदेशाध्यक्ष बदलावा ही अजितदादांचीच इच्छा होती; रुपाली ठोंबरे यांच्या दाव्याने राष्ट्रवादीत खळबळ!
दादांच्या मृत्यूनंतर आमदारांना फोन, इकडे मुखाग्नी दुसरीकडे मंत्रीपद...
दादांच्या मृत्यूनंतर आमदारांना फोन, इकडे मुखाग्नी दुसरीकडे मंत्रीपदासाठी... NCP तील नेत्याने अखेर सांगितलंच
मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार?; सरकारचा हायकोर्टात मोठा दावा...
Mumbai High Court | मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार?; सरकारचा हायकोर्टात मोठा दावा, उपवर्गीकरणाचा दाखला देत काय म्हटलं?
मोठी बातमी! एकनाथ शिंदे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या भेटीला
मोठी बातमी! एकनाथ शिंदे पुन्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या भेटीला, राजकीय हालचाली वाढल्या
पोलिसांशी पंगा भोवला! अभिजीत दीपकेंचं पोलीस संरक्षण जाणार?
Abhijeet Dipke | पोलिसांशी पंगा भोवला! अभिजीत दीपकेंचं पोलीस संरक्षण जाणार?; नेमकी काय आहे मागणी?