AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देश डीजिटल पत्रकारितेकडे वळतोय, माध्यमं कधीच बंद होणार नाही; उमेश कुमावत यांचं प्रतिपादन

लोकांना निःपक्ष बातम्या हव्या असतात, आपला देश डीजिटल पत्रकारितेकडे वळत आहे. अमेरिकेमध्ये 88 टक्के लोक डीजिटलमध्ये काम करतात हे आता हळू हळू आपल्या भारतात होणार आहे, असं उमेश कुमावत यांनी म्हटलं आहे.

देश डीजिटल पत्रकारितेकडे वळतोय, माध्यमं कधीच बंद होणार नाही; उमेश कुमावत यांचं प्रतिपादन
| Updated on: Mar 23, 2025 | 9:49 PM
Share

लोकांना निःपक्ष बातम्या हव्या असतात, आपला देश डीजिटल पत्रकारितेकडे वळत आहे. अमेरिकेमध्ये 88 टक्के लोक डीजिटलमध्ये काम करतात हे आता हळू हळू आपल्या भारतात होणार आहे. वाढत असलेली डीजिटल पत्रकारिता हे ग्रामीण पत्रकारांसमोरील मोठं आव्हान असणार आहे. माध्यमं कधीच बंद होणार नाहीत, असं प्रतिपाद टीव्ही ९ मराठीचे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी केलं आहे. ते मंचर येथे आयोजित पत्रकार कार्यशाळेत पत्रकारांना मार्गदर्शन करताना बोलत होते.

नेमकं काय म्हणाले कुमावत? 

आपला देश डीजिटल पत्रकारितेकडे वळत आहे. अमेरिकेमध्ये 88 टक्के लोक डीजिटलमध्ये काम करतात हे आता हळू हळू आपल्या भारतात होणार आहे. वाढत असलेली डीजिटल पत्रकारिता हे ग्रामीण पत्रकारांसमोरील मोठं आव्हान असणार आहे. ग्रामीण पत्रकारांना मार्गदर्शन करण्याची गरज नाही कारण ते स्वयंभू आहेत. माझा 25 वर्षांचा अनुभव आहे. मी अल्फा मराठीत बातम्या दिल्या, आजतकमध्ये असताना गुजरातमध्ये भूकंप झाला आणि त्या भूकंपामुळे आजतकचा जन्म झाला असं मी म्हणेन. ग्रामीण पत्रकारांनी पत्रकारितेसोबत जोड व्यवसाय करावा हे माझं वयैक्तिक मत आहे आहे. कारण त्यांनाही कुटुंब आहे.  पत्रकारिता टिकली तर लोकशाही टिकणार आहे, असं उमेश कुमावत यांनी यावेळी म्हटलं.

पुढे बोलताना ते म्हणाले की, प्रिंट मीडिया आता डीजिटल मीडियाकडे वळला जात आहे. टीव्ही मीडियाला आता 25 वर्ष झाली आहेत. मात्र पूर्वी आणि आताही प्रिंट मीडियाची विश्वासार्हता जास्त आहे. पत्रकारांबद्दलचा आदर कमी झाला त्याला जबाबदार टीव्ही मीडियाच आहे. आपला देश डीजिटल मीडियाकडे वळत आहे, त्याचा परिणाम असा झाला की, वर्तमान पत्राच्या अनेक आवृत्या कमी झाल्या आहेत. मात्र अजूनही देशात दोन नंबरला मराठी पेपरचा खप आहे. परंतु आता प्रिंट मीडिया कमी होत जाणार आहे.

क्रिकेटमध्ये पूर्वी 5 दिवसांची कसोटी होती,  त्यानंतर वनडे आली आता टी20 आली आहे, त्यामुळे बदल करावा लागणार आहे.  बातमीचा डाटा पाहिला जातो आणि त्यानुसार आम्ही बातम्या करतो. बीड प्रकरणाततील बातम्या पाहा, माध्यमांची ताकत कमी होणार नाही, परंतु त्याचे स्वरुप बदलेल. हे आपल्याला बीडमधील संतोष देशमुख प्रकरणातून समजून येईल. या प्रकरणात माध्यमांमुळेच हत्येचा गुन्हा दाखल झाला. माध्यमं  केव्हाही बंद होणार नाहीत. पत्रकारिता टिकली तरच लोकशाही टिकणार आहे.

जुनी पत्रकारिता ही देशाला स्वतंत्र करण्यासाठी होती. मात्र आता पत्रकारितेचं स्वरुप बदलत चाललं आहे. मोबाईलवर पत्रकारिता आली आहे. 2014 साली गोपीनाथ मुंडे यांचा दिल्लीत अपघात झाला तेव्हा मी दिल्लीत होतो. त्यांच्या गाडी जवळ मी गेलो, त्यावेळी माझ्याकडे कॅमेरा नव्हता. मग मी तेथील एकाला मोबाईल पकडायला लावला आणि ती गाडी सगळ्यात आधी दाखवली. मी मोबाईलवर पहिला वॉक थ्रू केला.  ज्यावेळी आपल्याकडे काही नसेल तेव्हा पर्याय निवडला पाहिजे, असं उमेश कुमावत यांनी पत्रकारांना मार्गदर्शन करताना म्हटलं.

नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.