कोल्हापुरातल्या पाटीलवाडीच्या माळावर चिअर गर्ल्सच्या साथीनं क्रिकेट स्पर्धा, पोलीस येताच संयोजकांची धूम

गेल्या काही महिन्यांपासून अनलॉकची प्रक्रिया सुरु केल्यापासून काही देशांमध्ये क्रीडा स्पर्धा सुरु झाल्यात खऱ्या, परंतु त्यावर अनेक नियम आणि निर्बंध आहेत.

कोल्हापुरातल्या पाटीलवाडीच्या माळावर चिअर गर्ल्सच्या साथीनं क्रिकेट स्पर्धा, पोलीस येताच संयोजकांची धूम
Follow us
| Updated on: Dec 11, 2020 | 6:07 PM

कोल्हापूर : कोरोना या साथीच्या रोगामुळे संपूर्ण जगभरातील क्रीडा स्पर्धांवर निर्बंध आले आहेत. चार-पाच महिने जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडॉऊन घोषित करण्यात आला होता. गेल्या काही महिन्यांपासून अनलॉकची प्रक्रिया सुरु केल्यापासून काही देशांमध्ये क्रीडा स्पर्धा सुरु झाल्यात खऱ्या, परंतु त्यावर अनेक नियम आणि निर्बंध आहेत. जगभरातील क्रीडा स्पर्धांवर कोरोनाचे सावट असताना कोल्हापुरात मात्र आज वेगळेच चित्र पाहायला मिळाले. कोरोनाबाबातचे सर्व नियम धाब्यावर बसवून कोल्हापुरातील पाटीलवाडीत एक आगळीवेगळी क्रिकेट स्पर्धा नुकतीच पार पडली, तीही चक्कर चिअर गर्ल्सच्या साथीनं. (Cricket tournament with Cheer Girls in Kolhapur, Filed a case with Radhanagari police)

कोल्हापुरातील पाटीलवाडीत चिअर गर्ल्सच्या साथीनं एक क्रिकेट स्पर्धा पार पडली. त्यातही या चिअर गर्ल्सचा नाच असा होता की, क्रिकेट बाजूला ठेवून आसपासच्या गावांमधील शेकडो तरुणांनी वेगळाच खेळ मांडला. डॉल्बीच्या ठेक्यावर चाललेला हा धिंगाणा पोलीस ठाण्यापर्यंत जाऊन पोहचला. पोलीस घटनास्थळाजवळ पोहोचताच संयोजकांसह चिअर गर्ल्स आणि नाचणाऱ्या पोरांनी धूम ठोकली.

पाटीलवाडीतील शिवारात लावलेला तंबू पाहून लोकांना इथे काय सुरु आहे याचा नेमका अंदाज बांधताच आला नाही. या ठिकाणी ‘ब्राझील… ब्राझील…’ पासून ते ‘तेरी आख्या का यौ काजल’ या गाण्यांवर थिरकणाऱ्या तरुणी आणि त्यांच्या सोबत बेधुंदपणे नाचणारे तरुण पाहून लोकांना वाटेल की, इथे एखादा नृत्याचा किंवा जत्रेचा कार्यक्रम आहे. परंतु जर कोणी सांगितलं की इथे क्रिकेटच्या स्पर्धा सुरू आहेत, तर कोणाचाही त्यावर विश्वास बसणार नाही. कारण इथे क्रिकेट सोडून दुसरच काहीतरी सुरु होतं.

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील गवशीपैकी पाटीलवाडीतल्या रघुनाथ पाटील यांच्या मुलाचा 8 डिसेंबरला वाढदिवस होता. मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या हौशी बापानं आपल्या शिवारात हाफ पिच क्रिकेट स्पर्धा भरवल्या होत्या. या स्पर्धेत रंग भरण्यासाठी चिअरगर्ल्सही आणल्या. आता चिअरअप करायला तरुणी आहेत म्हटल्यावर स्पर्धेला रंग तर चढणारच ना भाऊ.

पाटीलवाडीच्या माळावर चिअरगर्ल्स आल्यात म्हटल्यावर एरव्ही क्रिकेट न खेळणारी पोरंसुद्धा माळावर हजर झाली, आणि त्यांनी क्रिकेट सोडून वेगळाच खेळ सुरू केला. काहिंनी तर स्टेजवर जाऊन थेट चिअरगर्ल्ससोबत नाचण्याचा आनंद लुटला. पोरांचा हा उत्साह पाहुन चिअर गर्ल्सनाही राहावलं नाही. पोरांना त्रास नको म्हणून त्याच खाली उतरल्या आणि त्यांनी लावणीच्या ठेक्यावर पोरांबरोबर ताल धरला.

दिवसभर सुरू असलेल्या या वीभत्स प्रकाराची माहिती अखेर राधानगरी पोलिसांना मिळाली. पोलीस घटनास्थळी पोहोचताच स्पर्धा भरवणारे बापलेक आणि चिअरगर्ल्सनी तिथून धूम ठोकली. पाटीलवाडीच्या माळावर नाचायला जमलेली पोरंसुद्धा पळून गेली. मात्र तोवर या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. कोरोनाचे निर्बंध असताना कोणतीही परवानगी न घेता क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केल्याबद्दल दिनकर पाटील यांच्यासह चिअर गर्ल्स आणि त्यांच्यासोबत नाचणाऱ्या तरुणांवर राधानगरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक अनिल कदम यांनी दिली

इतर बातम्या

Fact Check | कोरोना लसीद्वारे मानवी शरीरात ‘मायक्रो चिप’ लावण्याची अफवा, पाहा तज्ज्ञ काय म्हणतायत…

आयआयटीत शिक्षण, तरीही भीक मागण्याची वेळ, मध्यप्रदेशच्या आजोबाची चटका लावणारी कहाणी

‘बिनोद’चा ट्विटरवर पहिला नंबर, या वर्षी ठरला मीम्सचा बादशाहा

(Cricket tournament with Cheer Girls in Kolhapur, Filed a case with Radhanagari police)

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.