AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लहान मुलांमधील दुर्मिळ ‘एसएमए’ आजाराचे संकट! राज्यभरात औषधासाठी क्राऊड फंडिंग

लहान मुलांमध्ये 'एसएमए' या दुर्मिळ जनुकीय आजाराची लक्षणे वाढत असून कोट्यवधींच्या खर्चामुळे क्राऊड फंडिंग सुरू आहे. या गंभीर परिस्थितीत 'जिजा संस्थेच्या' नेहा देसाई गेल्या 2 वर्षांपासून प्रयत्न सुरू आहे.

लहान मुलांमधील दुर्मिळ 'एसएमए' आजाराचे संकट! राज्यभरात औषधासाठी क्राऊड फंडिंग
लहान मुलांमधील दुर्मिळ 'एसएमए' आजाराचे संकट! कोल्हापुरात औषधासाठी क्राऊड फंडिंग
| Edited By: | Updated on: Sep 10, 2026 | 8:38 PM
Share

लहान मुलांमध्ये ‘एसएमए’ या अत्यंत दुर्मिळ आणि गंभीर जनुकीय आजाराची लक्षणे मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. या आजाराच्या उपचारांचा खर्च कोट्यवधींच्या घरात असल्याने सामान्य पालकांचे कंबरडे मोडले आहे. ‘एसएमए’ म्हणजेच स्पाइनल मस्कुलर ॲट्रोफी हा एक असा दुर्मिळ आजार आहे, जो लहान मुलांमधील मज्जासंस्था आणि स्नायूंच्या शक्तीवर थेट हल्ला करतो.आता यावर केंद्र आणि राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घेण्याची तीव्र गरज निर्माण झाली आहे. ‘एसएमए’ आजारावर सध्या भारतात कोणतीही स्वस्त लस किंवा पूर्ण उपचार उपलब्ध नाहीत. या आजारावरील उपचारांचा खर्च कोट्यवधींच्या घरात आहे. सध्या ‘एसएमए स्टेज-2’ चा सामना करत असलेल्या लहान मुलाच्या उपचारासाठी 10 कोटी रुपयांचे क्राऊड फंडिंग गोळा करण्याची मोहीम राज्यभरात सुरू आहे. तशाच प्रकारची मोहीम सातारा मधील पारस बागल या मुलासाठी देखील सुरू आहे.

या आजारात मुलांच्या शरीरातील स्नायू हळूहळू कमकुवत होतात. मुलांना साधे बसणे, उभे राहणे किंवा मान धरणेही अशक्य होते. आजाराचे गांभीर्य वाढल्यास फुफ्फुसांचे स्नायू निकामी होतात, ज्यामुळे मुलांना श्वास घेण्यास आणि अन्न गिळण्यास प्रचंड त्रास होतो, जे लहान मुलांच्या जिवासाठी अत्यंत घातक ठरते.

रुग्णांची संख्या आणि उपचारांचा अवाढव्य खर्च पाहता, यावर केवळ लोकवर्गणी करून प्रश्न सुटणार नाही, हे ओळखून कोल्हापुरातील ‘जिजा संस्थेच्या’ नेहा देसाई या गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने प्रशासकीय पातळीवर लढा देत आहेत. ‘एसएमए’ग्रस्त बालकांना सरकारी स्तरावरून थेट आर्थिक मदत आणि स्वस्त औषधे मिळावीत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Follow Us
अमरावती शिक्षक मतदारसंघात किरण सरनाईक यांची आघाडी कायम
अमरावती शिक्षक मतदारसंघात किरण सरनाईक यांची आघाडी कायम, 21 फेऱ्यांनंतर निकाल जवळपास निश्चित
कौस्तुभ गावडेंनी टीकेला दिलं उत्तर; शिक्षक मतदारसंघात भाजपची बाजी
Kaustubh Gawade : कमी वय, मोठी संधी अन् विजय, कौस्तुभ गावडेंनी टीकेला दिलं उत्तर; शिक्षक मतदारसंघात भाजपची बाजी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ऐनवेळी पाठिंबा दिल्याने... शिक्षक नेते...
Maharashtra MLC Election 2026 Result : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ऐनवेळी पाठिंबा दिल्याने... सचिन सानप काय म्हणाले?
कौस्तुभ गावडे विजयाच्या उंबरठ्यावर; स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत...
Kaustubh Gawde MLC Result : कौस्तुभ गावडे विजयाच्या उंबरठ्यावर; स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत गुलालाची उधळण
बॅलेट पेपरवरही महायुतीची आघाडी; भाजपनं विरोधकांना निवडणूक निकालातून...
बॅलेट पेपरवरही महायुतीची आघाडी; भाजपनं विरोधकांना निवडणूक निकालातून दिलं प्रत्युत्तर?
पुणे पदवीधरमध्ये मविआच्या हर्षदा जाधव विजयाच्या उंबरठ्यावर
Harshada Deshmukh : पुणे पदवीधरमध्ये मविआच्या हर्षदा जाधव विजयाच्या उंबरठ्यावर
जाधव विरुद्ध जाधव; कोण मारणार बाजी? अंतिम निकालाकडे लक्ष
Pune Padvidhar Matdarsangh Result 2026 : जाधव विरुद्ध जाधव; पुणे पदवीधर मतदारसंघात कोण मारणार बाजी? अंतिम निकालाकडे लक्ष
विधानपरिषद निवडणुकीत पुण्यात ट्विस्ट; दोन माजी शिक्षक आमदारांचा पराभव
Maharashtra MLC Result 2026 Complete : विधानपरिषद निवडणुकीत पुण्यात मोठा ट्विस्ट; दोन माजी शिक्षक आमदारांचा पराभव, सानप-गावडे यांच्यात चुरस
पुणे, अमरावती, नाशिकमध्ये १०-१० हजार रुपये वाटले; संजय राऊतांचा दावा
Sanjay Raut : पुणे, अमरावती, नाशिकमध्ये १०-१० हजार रुपये वाटले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
मराठवाडा पदवीधर मतदारसंघात चुरस वाढली; प्रतापसिंह पाटील आघाडीवर तर....
Marathwada MLC Election Results 2026 : मराठवाडा पदवीधर मतदारसंघात चुरस वाढली; प्रतापसिंह पाटील आघाडीवर, सतीश चव्हाण पिछाडीवर