Cyclone in Maharashtra: रात्र वैऱ्याची, रायगड किनारपट्टीवर मध्यरात्री वादळ धडकणार; नागरिकांचे स्थलांतर सुरू

गोवा आणि कर्नाटकात दाणादाण उडवून देणाऱ्या तौक्ते चक्रीवादळाने आता रायगडकडे कूच केली आहे. (Cyclone Tauktae likely to intensify overnight in Raigad)

Cyclone in Maharashtra: रात्र वैऱ्याची, रायगड किनारपट्टीवर मध्यरात्री वादळ धडकणार; नागरिकांचे स्थलांतर सुरू
तौत्के चक्रीवादळ


रायगड: गोवा आणि कर्नाटकात दाणादाण उडवून देणाऱ्या तौक्ते चक्रीवादळाने आता रायगडकडे कूच केली आहे. आज मध्यरात्री तौक्ते चक्रीवादळ रायगड किनारपट्टीवर धडकणार आहे. या वादळाचा तडाखा किती असेल हे सांगता येत नसल्याने नुकसान टाळण्यासाठी रायगड किनारपट्टीवरील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करण्यात येत आहे. किनारपट्टीला वादळाचा तडाखा बसणार असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. (Cyclone Tauktae likely to intensify overnight in Raigad)

तौक्ते चक्रीवादळाबाबत आज जिल्हा प्रशासनाने माहिती दिली. रात्री उशिरा तौक्ते चक्रीवादळ रायगड किनारपट्टीला धडकणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील किनारपट्टी आणि सखल भागातील नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत आहे. अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, उरण तालुक्त्यातील 1600 लोकांचे स्थलांतर करण्यात आले असून त्यांना शाळा आणि इतर सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

जोरदार पावसाचा इशारा

वादळाबरोबरच रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होणार असल्याचं प्रशासनाने सांगितलं. यावेळी कुणीही घराबाहेर पडू नका, असं आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

रत्नागिरीत समुद्रा खवळला

तौत्के चक्रीवादळाचा फटका आता रत्नागिरीच्या किनारपट्टीला बसतोय. रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यावर अंगावर थरकाप उडवेल असं वादळाचं रौद्ररुप बघायला मिळतंय. तसेच जवळपास चार ते पाच फुटांपर्यंत समुद्राच्या लाटा उसळताना दिसत आहेत. त्यामुळे समुद्राचं पाणी रस्त्यावर आलं आहे. रत्नागिरीच्या किनारपट्टी परिसरात ताशी 90 किमी वेगाने वारा वाहतोय. तौत्के वादळ आता गुजरातच्या दिशेला निघालं आहे, अशी माहिती समोर आली आहे.

गोव्यात दोघांचा मृत्यू

गोव्यात तौक्ते वादळामुळे प्रचंड दाणादाण उडाली आहे. या वादळामुळे गोव्यात आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. यात विजेचा खांब पडल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्याचा मृत्यू झाड अंगावर पडल्याने झाला आहे. दरम्यान, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच मच्छिमारांनाही सावध राहण्याचा आणि समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर प्रशासन सज्ज

तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर प्रशासन सज्ज झाले आहे. सागरी पोलीस व तटरक्षक जवानांना समुद्र किनाऱ्यावर तैनात करण्यात आले आहे. मच्छिमारीसाठी समुद्रात गेलेल्या बोटी समुद्र किनाऱ्यावर पोहचल्या आहेत. आज सकाळपासूनच वसई-विरार नालासोपारा क्षेत्रात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाच्या आवाहनानुसार अनेक मच्छीमार बांधवानी आपल्या बोटी व अतिरिक्त जाळे, तसेच इतर सामुग्री किनारपट्टीवर सुखरूप बाहेर काढली आहे. तौक्ते चक्रीवादळाचा फारसा फरक वसई-विरार मधील समुद्र किनाऱ्यावर सध्या दिसून येत नाही, मात्र येथील प्रसशासन पूर्णता सज्ज झाले असून, खबरदारी पाळत असल्याचे दिसून येत. (Cyclone Tauktae likely to intensify overnight in Raigad)

संबंधित बातम्या:

Cyclone Tauktae Tracker LIVE Updates | रात्री उशिरा चक्रीवादळ रायगड किनारपट्टीवर धडकणार, किनारपट्टी आणि सखल भागातील नागरिकांचे स्थलांतर सुरू

Tauktae Cyclone: रत्नागिरीच्या देवरुखमध्ये भलमोठं झाडं कोसळलं, तोक्ते चक्रीवादळामुळं वाऱ्यांचा वेग 40 किमी

Photo : तौक्ते वादळाचं रौद्ररुप, गोव्यात दाणादाण तर गुजरातमध्ये एनडीआरएफ सज्ज

(Cyclone Tauktae likely to intensify overnight in Raigad)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI