AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tauktae Cyclone | रायगडमध्ये तौत्के चक्रीवादळाचा पहिला बळी, भिंत कोसळून महिलेचा मृत्यू

अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या ‘तौत्के’ चक्रीवादळाचा (Tauktae Cyclone) राज्यातील पहिला बळी गेला आहे. (Cyclone Taukte in Raigad wall collapsed one woman died)

Tauktae Cyclone | रायगडमध्ये तौत्के चक्रीवादळाचा पहिला बळी, भिंत कोसळून महिलेचा मृत्यू
| Updated on: May 17, 2021 | 10:52 AM
Share

रायगड : अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या ‘तौत्के’ चक्रीवादळाचा (Tauktae Cyclone) राज्यातील पहिला बळी गेला आहे. रायगडमधील उरण शहरातील बाजारपेठेत भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. कोकण किनारपट्टीला समांतर वाटचाल करत असलेल्या तौत्के चक्रीवादळानं गती घेतली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होत आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी झाड कोसळल्याची घटना समोर आली आहे. (Cyclone Taukte in Raigad wall collapsed one woman died)

उरणमध्ये तौत्के चक्रीवादळाचा पहिला बळी

रायगडमधील उरणमध्ये तौत्के चक्रीवादळाचा पहिला बळी गेला आहे. उरण शहरातील बाजारपेठेत वादळी वाऱ्यामुळे भिंत कोसळली आहे. त्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर एक भाजीविक्रेती महिला जखमी झाली आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.

तर दुसरीकडे रायगडमध्ये खोपोलीतील काजुवाडी येथील वस्ती मध्ये दोन घरांवर झाड कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही. खोपोली नगरपालिका यत्रंणानी तात्काळ घटनास्थळ गाठले. त्यानंतर कटरच्या सहाय्याने झाड तोडून बाजूला  करण्याचे मदत कार्य सध्या सुरु आहे.

मुंबईपासून 150 किमी अंतरावर तौत्के चक्रीवादळ

सध्या तौत्के चक्रीवादळ हे मुंबईपासून सुमारे 150 किमी अंतरावर आहे. तौत्के चक्रीवादळाचा मुंबईला धोका नाही, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. मात्र हे चक्रीवादळ मुंबईनजीकच्या समुद्रातून जाणार असल्याने सध्या त्याचा प्रभाव सर्वत्र पाहायला मिळत आहे. मुंबईत सध्या वेगवान वाऱ्यासह जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे.

रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्याला वादळाचा फटका

रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यालगत असणाऱ्या राजापूर, सिंधुदुर्ग, आंबोळगड यांसह इतर गावांना चक्रीवादळाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. रत्नागिरीतील 104 गावांमधील 800 ते 1 हजार घरांची पडझड झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे.

रत्नागिरीसह सिंधुदुर्गातील बहुतांश गावात वीज पुरवठा खंडित झाला आहे. रत्नागिरी, राजापुर, देवगड, मालवण, वेगुर्ले या भागातील बत्ती गुल झाली आहे. काही ठिकाणी काल दुपारपासूनच वीज पुरवठा खंडित झाला आहे. तौत्के चक्रीवादळच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टीवरून आतापर्यंत 6 हजार 540 नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. (Cyclone Taukte in Raigad wall collapsed one woman died)

संबंधित बातम्या : 

Cyclone Tauktae Tracker LIVE Updates | रायगडमध्ये तौत्के चक्रीवादळाचा पहिला बळी, भिंत कोसळून महिलेचा मृत्यू

Tauktae Cyclone | कुठे झाडांची पडझड, कुठे घरांचे नुकसान, महाराष्ट्रात तौत्के चक्रीवादळाचा हाहा:कार

Tauktae Cyclone PHOTO : तौत्के चक्रीवादळाचे रौद्ररुप, वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.