पुणे महापानगरपालिका आता कर्मचाऱ्यांची ‘नशा’ उतरवणार!

व्यसनमुक्ती केंद्रात उपचारांसाठी पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना पगारी रजाही दिली जाणार आहे. त्याचबरोबर व्यसनमुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सत्कार केला जाणार आहे.

पुणे महापानगरपालिका आता कर्मचाऱ्यांची 'नशा' उतरवणार!
मस्तच! पुणे सावरलं, कोरोना रिकव्हरी रेट 96 टक्क्यावर

पुणे: व्यसनाच्या जोखडात अडकून पडलेल्या आपल्या कर्मचाऱ्यांना व्यसनमुक्त करण्यासाठी आता पुणे महानगरपालिकेनं पुढाकार घेतला आहे. व्यसनाचा विळखा सोडवण्यासाठी धडपडत असलेले आपले कर्मचारी आणि सेवकांना व्यसनमुक्ती केंद्रात येणारा खर्च महापालिकेकडून उचलला जाणार आहे. महापालिकेच्या आरोग्य योजनेद्वारे हा खर्च केला जाणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.(De-addiction program for employees by Pune Municipal Corporation)

विशेष बाब म्हणजे व्यसनमुक्ती केंद्रात उपचारांसाठी पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना पगारी रजाही दिली जाणार आहे. त्याचबरोबर व्यसनमुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सत्कार केला जाणार असल्याची माहितीही महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली आहे.

महिला व बालकल्याण विभागाचा पुढाकार

मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र आणि महिला व बालकल्याण समिती यांच्या सहकार्यातून महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी व्यसनमुक्ती आणि मन:स्वास्थ्य केंद्राचं उद्घाटन नुकतंच महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालक मुक्ता पुणतांबेकर, उपमहापौर सरस्वती शेंडगे, महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्ष माधुरी सहस्त्रबुद्धे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, उपायुक्त अजित देशमुख यांच्यासह अनेक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

एका महापालिका कर्मचाऱ्याने काही दिवसांपूर्वी व्यसनमुक्ती केंद्रात 10 दिवस उपचार घेतले. त्यासाठी त्याला जवळपास 10 हजार रुपये खर्च आला. तो खर्च पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळावा अशी मागणी करण्यात आलीय. यापूर्वी महापालिकेकडून अशाप्रकारचा खर्च देण्याचा कुठलाही धोरणात्मक निर्णय झालेला नाही. मात्र, आता महिला व बालकल्याण समितीनं पुढाकार घेत कर्मचाऱ्यांना व्यसनमुक्ती केंद्रात येणारा खर्च आणि उपचारांसाठी रजा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अतिरिक्त आयुक्तांनी दिली आहे.

उपक्रमाचा मुख्य उद्देश काय?

महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून पालिका कर्मचाऱ्यांना व्यसमुक्ती शिबिरात दाखल होण्यासाठी पगारी रजा देणं, त्यांना लागणाऱ्या खर्चाचा भार पालिकेनं उचलणं अशा महत्वाच्या तरतुदी केल्या आहेत. तसंच पुढील 3 महिन्यांत 6 कार्याशाळांचं आयोजनही करण्यात आलं आहे. पालिकेचे कर्मचारी व्यसनमुक्त होणं आणि त्यांची कार्यक्षमता वाढवणं, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचं महिला व बालकण्याण समितीच्या अध्यक्षा माधुरी सहस्त्रबुद्धे यांनी सांगितलं आहे.

संबंधित बातम्या:

राजमाता जिजाऊंच्या जयंतीदिनी इचलकरंजीत जन्मलेल्या मुलींच्या नावे 5 हजारांची ठेव, खाटीक समाजाचा स्तुत्य उपक्रम

‘पुणे तिथे काय उणे’! पुणे महाराष्ट्रातील सर्वात ‘आनंदी’ जिल्हा

De-addiction program for employees by Pune Municipal Corporation

Published On - 8:28 am, Thu, 14 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI