गझलकार इलाही जमादार यांचे निधन, सांगलीतील मूळ गावी अंत्यसंस्कार होणार

सुप्रसिद्ध गझलकार आणि महाकवी म्हणून ओळख असलेले इलाही जमादार (Ilahi Jamadar) आज सकाळी निधन झाले. ते 75 वर्षांचे होते. (Ghazalkar Ilahi Jamadar death)

गझलकार इलाही जमादार यांचे निधन, सांगलीतील मूळ गावी अंत्यसंस्कार होणार
इलाही जमादार

पुणे : सुप्रसिद्ध गझलकार आणि महाकवी म्हणून ओळख असलेले इलाही जमादार (Ilahi Jamadar) आज सकाळी निधन झाले. ते 75 वर्षांचे होते. सांगली जिल्ह्यातील दुधगाव या त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (death of Ghazalkar Ilahi Jamadar the age of 75)

इलाही जमादार यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात गझलेला पोसलं. आपल्या समृद्ध लेखनीतून त्यांनी एकापेक्षा एक अशा गझल दिल्या. मराठ, हिंदी आणि अनेक उर्दू मासिकांमधून त्यांच्या कविता, गझल प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांच्या जाण्याने गझल पोरकी झाल्याची भावना गझलप्रमींमध्ये आहे.

सुरेश भट यांच्यानंतर जमादार यांचे नाव

इलाही जमादार यांचा जन्म 1 मार्च 1946 रोजी त्यांचा सांगलीतील दुधगावमध्ये झाला. 1964 पासून त्यांनी कविता लेखनास सुरुवात केली. लिखानात जादू आणि कवितेविषयीच्या जाणीवेमुळे त्यांनी अत्यंत कमी काळात कविता आणि गझलक्षेत्रामध्ये आपले नाव कमावले. पुढे त्यांच्या गझलांना एवढी प्रसिद्धी मिळाली की, सुरेश भट यांच्यानंतर गझलेला समृद्ध करणारी व्यक्ती म्हणून त्यांचे नाव घेतले जाऊ लागले.

गझलकार इलाही जमादार यांची शब्दांवर चांगली पकड होती. शब्दांची जाण असल्यामुळे त्यांच्या कविता थेट मनाला भिडत. मराठी, हिंदी, उर्दू भाषेची दैनिकं, मासिकांमधून त्यांच्या कविता प्रसिद्ध झालेल्या आहेत. 2020 च्या जलै महिन्यात ते तोल जाऊन पडल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर त्यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

इलाही जमादार यांचे साहित्य

मराठी – एक जखम सुगंधी, शब्दसुरांची भावयात्रा, स्वप्न तारकांचे, भावनांची वादळे (गझला व निवेदन)

हिंदी अल्बम – हिंदी पॉप गीते

संगीतिका –

हिंदी – सप्तस्वर, माया और साया, नीर क्षीर विवेक.

मराठी – स्वप्न मिनीचे

नृत्यनाट्ये :

हिंदी – नीरक्षीरविवेक

जखमा अशा सुगंधी , भावनांची वादळे , दोहे इलाहीचे, मुक्तक आदी इलाही जमादार यांचे काव्य आणि गझल संग्रहही प्रसिद्ध आहेत.

संबंधित बातम्या :

….अन् आयर्नमॅन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना अश्रू अनावर

(death of Ghazalkar Ilahi Jamadar the age of 75)

Published On - 1:07 pm, Sun, 31 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI