AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! राज्यातील भाजपच्या बड्या नेताला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी

मोठी बातमी समोर येत आहे. भाजप नेते प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे, तसेच त्यांना शिवीगाळ देखील करण्यात आली. या प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मोठी बातमी! राज्यातील भाजपच्या बड्या नेताला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी
| Updated on: Dec 10, 2024 | 3:37 PM
Share

मोठी बातमी समोर आली आहे. महयुतीचे समन्वयक आणि भाजपचे विधान परिषदेतील आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मनीष निकोसे नावाच्या व्यक्तीकडून आमदार लाड यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तसेच त्यांना अर्वाच्च भाषेत शिविगाळ देखील करण्यात आली आहे. या प्रकरणात प्रसाद लाड यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा आमदार प्रसाद लाड यांना या मनीष निकोसे नावाच्या व्यक्तीनं जीवे मारण्याची धमकी देत शिविगाळ केल्याचं समोर आलं आहे. या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घ्यावं तसेच त्याची कसून चौकशी करावी अशी मागणी प्रसाद लाड यांनी पोलिसांकडे केली आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की,  महायुतीचे समन्वयक आणि विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मनीष निकोसे नावाच्या व्यक्तीनं प्रसाद लाड यांना धमकी दिली आहे, तसेच त्यांना शिविगाळ देखील करण्यात आली. या प्रकरणात प्रसाद लाड यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र तक्रार दाखल केल्यानंतर देखील मनीष निकोसे नावाच्या या व्यक्तीनं पुन्हा एकदा लाड यांना जीवे मारण्याची धमकी देत शिविगाळ केली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.

दोन हजार लोकांसह तुझ्यावर हल्ला करेनं असं या धमकीत म्हटलं आहे. तसेच ज्याने प्रसाद लाड यांना धमकी दिली तो आरोपी कधी आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी  यांंच्या कार्यालयातून बोलत असल्याचं तर कधी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या कार्यालयातून बोलत असल्याचा दावा करतो. प्रकरण गंभीर असून सदर व्यक्तीची कसून चौकशी करावी, त्याच्यावर धमकीचा गुन्हा दाखल करावा आणि त्याला अटक करावी अशी विनंती आमदार प्रसाद लाड यांनी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीमध्ये केली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

Follow Us
गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?-जरांगे
Manoj Jarange Patil | गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?
मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
Mumbaicha Raja 2026 | मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला;
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला; म्हणाले, 'वातावरण खराब होऊ नये...
महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम!
Mahendra Thorave | महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम! महेंद्र थोरावेंचा राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल
हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
Ratnagiri Ganeshotsav | हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला
Rajapur | राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला; अपघातात 8 ते 10 जण गंभीर जखमी, नेमकं घडलं काय?
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी...
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी प्रकरणात एकाला अटक
भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
Bhopal | भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! जरांगेंचं भाजपला आव्हान
Manoj Jarange Patil | मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! मनोज जरांगेंचं भाजपला थेट आव्हान; बावनकुळेंवरही केले गंभीर आरोप
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे..
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे आश्वासन