आमचा फोन पोलिसांकडे ठेवला अन्…, आता सैरभ दास यांना वाटीते ती भीती, CJP च्या पत्रकार परिषदेत खळबळजनक दावा
आज दिल्लीमध्ये कॉकरोच जनता पार्टीची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सौरभ दास यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच पोलिसांवर देखील आरोप केले आहेत.

कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सीजेपीच्या वतीने दिल्लीमध्ये मोठं आंदोलन उभारण्यात आलं आहे. दिल्लीमध्ये शनिवारी या आंदोलनाला सुरुवात झाली. आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी पोलिसांनी कॉकरोच जनता पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना तर विमानातूनच दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना देखील ताब्यात घेण्यात आलं, त्यानंतर अखेर आज त्यांची सुटका करण्यात आली आहे. दरम्यान त्यानंतर आता आज पुन्हा एकदा कॉकरोच जनता पार्टीची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सीजेपीच्या वतीने सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. या पत्रकार परिषदेत बोलताना सीजेपीचे सदस्य सौरभ दास यांनी गंभीर आरोप केले आहेत.
नेमकं काय म्हणाले सौरभ दास?
पूर्ण देशात हुकुमशाही आलेली आहे अशी अवस्था आहे. इतक्या वर्षानंतर आता देशात हुकुमशहा बसला आहे आणि हे नागरी युद्ध आहे, अशी अवस्था त्यांनी देशात निर्माण करून ठेवली आहे. लोकांना आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या समस्याही मांडू दिल्या जात नाहीयेत. दरम्यान 24 तास आमचा फोन पोलिसांकडे ठेवला होता, आम्हाला भीती वाटतेय की आमच्या फोनमध्ये काहीतरी टाकल असेल, क्लोन केलेलं असेल आणि याआधी जे इतर सामाजिक कार्यकर्त्यांसोबत केल तेच आमच्यासोबत भविष्यात होईल, असंही यावेळी सैरभ दास यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, काही फ्रीलांस पत्रकारांना ताब्यात घेण्यात आल.. देशात स्वतंत्र पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांनाही दबाव आहे. पत्रकारांसाठीही ही आणीबाणी आहे. आमच्या या लढ्यात अनेक नेत्यांनी साथ दिली त्यांचे आभार, असंही यावेळी सौरभ दास यांनी म्हटलं आहे.
दरम्यान दुसरीकडे आशुतोष रांका यांनी देखील सरकारवर जोरदार टीका केली आहे. नरेंद्र मोदी देशाचे महान प्रधानपंत्री बनू पाहतायत, त्यांची महानता आम्हाला माहिती नाही पण ज्या इमर्जन्सी बद्दल आम्ही ऐकून होतो त्याची हद्द पार करून या सरकारने दाखवली, असं यावेळी आशुतोष रांका यांनी म्हटलं आहे.
