AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आताचे पुढारी म्हणजे…, अन् अजितदादांनी नेत्यांची लायकीच काढली, पाहा काय म्हणाले?

काँग्रेस सेवा दलाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला. या कार्यक्रमामध्ये बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं. 

आताचे पुढारी म्हणजे..., अन् अजितदादांनी नेत्यांची लायकीच काढली, पाहा काय म्हणाले?
Ajit Pawar Image Credit source: Tv9 Marathi
Updated on: Mar 25, 2025 | 6:48 PM
Share

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाचे माजी अध्यक्ष चंद्रकांत दायमा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सेवा दलाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला. या कार्यक्रमामध्ये बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं.  काम करताना चुकीचं वक्तव्य तुमच्या तोंडून बाहेर पडता कामा नये, बोलता बोलता चुकीचा शब्द बाहेर पडतो, त्यामुळ प्रॉब्लम होतात ते व्हायला नको. आपल्याला आगामी काळात होणाऱ्या  निवडणुकीला सामोरे जायचं आहे. आपण शिव, शाहू, फुले आंबेडकरांच्या विचारांचे आहोत हे सांगता आलं पाहिजे. अनेक लोक पक्षात येऊ पाहत आहेत, पण येणाऱ्यांची जनमानसात भूमिका चांगली पाहिजे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले अजित पवार? 

अनेक लोक पक्षात येऊ पाहत आहेत, पण येणाऱ्यांची जनमानसात भूमिका चांगली पाहिजे. आधीच कोणी चुकी केली असेल आणि मग त्याचा विचार असेल की सत्ताधारी पक्षात जाऊ असे असेल तर तसं होणार नाही.  उद्या पेपरात फोटो यायचा अमुक पक्ष प्रवेश झाला म्हणून. आपण भाषणात जे काही सांगू ते कृतीत आलं पाहिजे. कारण आपण यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचे आहोत. अलीकडचे पुढारी पाया पडायच्या लायकीचे राहिलेले नाहीत, त्यामुळे त्याच्या पाया पडायच्या भानगडीत पडू नका असा टोला यावेळी अजित पवार यांनी लगावला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, आज केंद्रात स्थिर सरकार आलं आहे, राज्यात महायुतीचे सरकार आहे. आपण लाडक्या बहिणींची चर्चा केली.  काम करताना आपण पारदर्शकपणे भूमिका घेतली पाहिजे, त्यामुळ तसे सांगणे गरजेच असते, काही वेळा लोकांना वाईट वाटते. सेवा दलाचं काम अधिक पुढे कसे घेऊन जाता येईल याचा विचार करावा लागेल. आता नवी पिढी फार कमी येत आहे, उन्हाळल्याची तीव्रता वाढली आहे, मी काल नांदेडला जाऊन आलो अनेक प्रश्न निर्माण होत आहेत, पण आपल्याला समजस्यानं भूमिका घ्यायची आहे. आपण महायुतीत आहे त्यामुळ तसेच काम करायचं आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

जिथे वडिलांनी लोकप्रतिनिधित्व केलं, तिथेच गवईंचा सत्कार
जिथे वडिलांनी लोकप्रतिनिधित्व केलं, तिथेच गवईंचा सत्कार.
सत्कार सोहळ्यात फडणवीसांकडून सरन्यायाधीश गवईंचे कौतुक
सत्कार सोहळ्यात फडणवीसांकडून सरन्यायाधीश गवईंचे कौतुक.
आम्ही आतंकवादी आहोत की दहशतवादी?पोलिसांच्या कारवाईवर अविनाश जाधव भडकले
आम्ही आतंकवादी आहोत की दहशतवादी?पोलिसांच्या कारवाईवर अविनाश जाधव भडकले.
अविनाश जाधवांची धडाकेबाज एन्ट्री अन् कार्यकर्त्यांचा जल्लोष
अविनाश जाधवांची धडाकेबाज एन्ट्री अन् कार्यकर्त्यांचा जल्लोष.
गोपनीय खात्यात लपवल, मध्यरात्री जे घडल ते अविनाश जाधवांनी सारं सांगितल
गोपनीय खात्यात लपवल, मध्यरात्री जे घडल ते अविनाश जाधवांनी सारं सांगितल.
त्यांना चपलेने मारलं पाहिजे..; राजन विचारेंची सरनाईकांवर आगपाखड
त्यांना चपलेने मारलं पाहिजे..; राजन विचारेंची सरनाईकांवर आगपाखड.
मोठी बातमी; पोलीस नमले, अविनाश जाधवांना सोडलं; बाहेर येताच म्हणाले...
मोठी बातमी; पोलीस नमले, अविनाश जाधवांना सोडलं; बाहेर येताच म्हणाले....
सरनाईकांच्या अंगावर बाटली फेकली, संघर्षाचं वातावरण अन् घोषणाबाजी
सरनाईकांच्या अंगावर बाटली फेकली, संघर्षाचं वातावरण अन् घोषणाबाजी.
MNS: ही सरकारची दडपशाही, अविनाशला सोडा, अन्यथा...संदीप देशपांडे आक्रमक
MNS: ही सरकारची दडपशाही, अविनाशला सोडा, अन्यथा...संदीप देशपांडे आक्रमक.
अखेर मनसेचा मोर्चा मीरा रोड स्थानकाच्या दिशेने निघाला
अखेर मनसेचा मोर्चा मीरा रोड स्थानकाच्या दिशेने निघाला.