AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीतील मोर्चात विदेशी ताकदी, आंतरराष्ट्रीय कट, एकनाथ शिंदे यांचे खळबळजनक विधान..

दिल्लीतील मोर्चावर एकनाथ शिंदे यांनी जोरदार टीका केली. कालचा दिवस काळा दिवस असल्याचे त्यांनी म्हटले. सुप्रीम कोर्टावर चाल करून जाण, दबाव आणण अशी कधीही न घडलेली घटना घडली. राहुल गांधी आणि इंडिया आघाडी यांचा निषेध करतो, असे त्यांनी म्हटले.

दिल्लीतील मोर्चात विदेशी ताकदी, आंतरराष्ट्रीय कट, एकनाथ शिंदे यांचे खळबळजनक विधान..
Eknath Shinde
| Updated on: Oct 13, 2026 | 12:26 PM
Share

काल दिल्लीत थेट कोर्टावर मोर्चा काढण्यात आला. इंडिया आघाडीकडून या मोर्चाचे आयोजन करण्यात आले. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आणि इंडिया आघाडीचे खासदार मोर्चात सहभागी होते. दिल्ली सीजेपीचे कार्यकर्ते असतानाच इंडिया आघाडी आक्रमक होताना दिसत आहे. नुकताच या आंदोलनावर भाष्य एकनाथ शिंदे यांनी केले. एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, कालचा दिवस हा देशाच्या इतिहासातील काळा दिवस होता. बाबासाहेबांनी जे संविधान दिल… संविधानिक संस्था उभ्या केल्या. सुप्रीम कोर्टावर चाल करून जाण, दबाव आणण अशी कधीही न घडलेली घटना घडली. राहुल गांधी आणि इंडिया आघाडी यांचा निषेध करतो. निषेध करावा तेवढा थोडा होईल. लोकशाहीत त्यांना अधिकार आहे. याचिका दाखल करायला मोर्चा घेऊन जाण ही कोणती पद्धत?

भारताच्या न्यायव्यवस्थेवर हल्ला होता म्हणून त्यांनी माफी मागितली पाहिजे. संविधान कसं नष्ट होईल… लोकशाहीचा गळा घोटण्याच काम कसं होईल हे त्यांच्या मार्फत सुरु आहे. जे आपण पाहतोय ते देशाला घातक आहे. अनेक परकीय शक्ती यात आहेत. विदेशी ताकदी आहेत… आंतराष्ट्रीय कट कारस्थानाचा भाग आहे अशी शंका येतेय.

देशाला अराजकतेकडे नेण्याच काम हे करतायत हे अतिशय दुर्दैवी आहे, हे देशाला घातक आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले. पुढे बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, निवडणुकीत जिंकता येणार नाही… प्रधानमंत्री यांच्यासमोर जिंकता येत नाही म्हणून हे असं करण्याच काम सुरु आहे. यासोबतच एकनाथ शिंदे यांनी काही गंभीर आरोपही केले.

एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, विरोधक देशाच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचे काम करत आहेत. परकीय शक्तीच्या माध्यमातून देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यांच्या देशद्रौही मानसिकतेवर कायम बोलायचे. त्यांची मानसिकता आहे की, केंद्रात आमची सत्ता येणार नाही. या मानसिकेतून त्यांच्याकडून हे दररोज केले जात आहे. विरोधकांकडून संविधान नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

आणीबाणीबद्दल बोलताना शिंदेंनी म्हटले की, देशात आणीबाणी असती तर ते आंदोलन सुप्रीम कोर्टात गेले असते का? आता तर सगळे व्यक्त होतात बोलतात. ही आणीबाणी की तेव्हाही आणीबाणी, ⁠तेव्हा सगळे बंद होत. न्यायव्यवस्थेत चाल करून जाणे अपमान करणे हे योग्य आहे का? ⁠जे भारत तोडोची भाषा करणारे त्यांना सोडण्याची भाषा करतात आंदोलन करतात.

त्यांना माहिती आहे त्यांच्या मागण्या चुकीच्या आहेत. न्याय मिळणार नाही त्याना माहिती चुकीच्या मागण्या केल्या. मतदान वाढले कसे यावर आंदोलन केले. आता sir वर नाव कमी झाली तर त्यासाठी आंदोलन करतात. फॉर्म 6 आहे ना कोणावर अन्याय होणार नाही. तो हाफपलेल्यांचा थयथयाट होता तोही सत्तेतसाठी. ⁠शंकरांचा अपमान आहे, ⁠त्यांना काही सुचत नाही. तिसरा डोळा उघडला तर इंडिया आघाडी धुवून जाईल.

लोक जमा झाले की घराच्या बाहेर यायचे, त्यांना कुठे जास्त लांब जायचंय त्यांना आयता प्लॅटफॉर्म मिळतो सामील होतात.  ⁠मोदींच्या विरोधात बोलायचे. मोदींनी त्यांना बेरोजगार केले त्यामुळे काम काय दुसर आंदोलन करायच सोडून. पूर्णेकर प्रकरणावर बोलताना त्यांनी म्हटले की, *ही घटना दुखद आहे…⁠आम्ही पोलिसांशी बोललो आहे. याचा तपास सुरू आहे कोणालाही ⁠पाठीशी घालणार नाही…

Follow Us
सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढला हा इतिहासातील काळा दिवस; शिंदेंचा....
Eknath Shinde : सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढला हा इतिहासातील काळा दिवस; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींच्या आंदोलनावर घणाघात
ना जास्त मतं, ना कमी, ईश्वरचिठ्ठीने ठरला विजय; यवतमाळमध्ये मविआच्या...
Yavatmal : ना जास्त मतं, ना कमी, ईश्वरचिठ्ठीने ठरला विजय; यवतमाळमध्ये मविआच्या उमेदवाराचा विजय
बॅरिकेटिंग, RAF तैनात अन् पोलिसांचा बंदोबस्त; जंतरमंतरवर आंदोलनाआधीच..
Delhi CJP Protest : बॅरिकेटिंग, RAF तैनात अन् पोलिसांचा बंदोबस्त; जंतरमंतरवर आंदोलनाआधीच CJP नेत्यांना रोखलं
आंदोलनं दडपली तर...; संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा, म्हणाले...
Sanjay Raut : आंदोलनं दडपली तर...; संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा, म्हणाले...
आशुतोष रांका, सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं
CJP : आशुतोष रांका, सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं; नेमकं काय घडलं?
बँकेत कर्मचारी केक कापण्यात व्यस्त, शेतकरी मात्र...; व्हिडिओ व्हायरल
Viral Video : बँकेत कर्मचारी केक कापण्यात व्यस्त, शेतकरी मात्र...; बुलडाण्यातील व्हिडिओ व्हायरल
अभिजित दिपके आज हिंगोलीतून दिल्लीला रवाना होण्याची शक्यता; नेमकं काय..
Abhijeet Dipke : अभिजित दिपके आज हिंगोलीतून दिल्लीला रवाना होण्याची शक्यता; नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणात आज सुनावणी; सुप्रीम कोर्टात काय घडणार?
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणात आज महत्त्वाची सुनावणी; सुप्रीम कोर्टात काय घडणार?
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!