AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Parth Pawar Land Scam Controversy : जमीन गैरव्यवहार प्रकरण, शीतल तेजवानी फरार ? फोन बंद, घरातही…

बावधन पोलीस ठाण्यात शीतल तेजवानी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी पॉवर ऑफ ॲटर्नी ही शीतल तेजवानी यांच्याकडे होती, त्यामुळे तेजवानी विरोधात गुन्हा दाखल आहे,. मात्र सध्या ती फरार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Parth Pawar Land Scam Controversy : जमीन गैरव्यवहार प्रकरण, शीतल तेजवानी फरार ? फोन बंद, घरातही...
Shital Tejwani - Parth Pawar
| Updated on: Nov 08, 2025 | 10:12 AM
Share

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे चिरंजीव पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या जमीन खरेदीचं प्रकरण सध्या खूप गाजतंय. कोरेगाव पार्क येथील जमीन खरेदी करताना गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. 1800 कोटी मूल्य असलेली जमीन 300 कोटी रुपयांत विकत घेतली, तसेच स्टँप ड्युटी म्हणून अवघे 500 रुपये भरले असे आरोप पार्थ पवार यांच्या वर होत असून त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधकांनी हे प्रकरण लावून धरत पार्थ पवार, त्यांचे वडील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधत कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

पार्थ पवार अडचणीत सापडलेल्या या जमीन गैरव्यवहार प्रकरणात आत्तापर्यंत शीतल तेजवानी (Shital Tejawani) , दिग्विजय पाटील आणि निलंबित उपनिबंधक रवींद्र तारू, या तीन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र आता याच प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. गुन्हा दाखल झालेल्या शीतल तेजवानी या फरार झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

कुठे आहे शीतल तेजवानी ?

मिळालेल्या माहितानुसार, बावधन पोलीस ठाण्यात शीतल तेजवानी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी पॉवर ऑफ ॲटर्नी ही शीतल तेजवानी यांच्याकडे होती, त्यामुळे तेजवानी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र गेल्या दोन दिवसांपासून तिचा फोन बंद आहे. तिचा वास्तव्याचा जो पत्ता आहेत, तिथेही बावधन पोलिसांनी चौकशी केली, मात्र शीतल तेजवानी त्या पत्त्यावरील घरात आढळली नाही. त्यामुळे कदाचित शीतल तेजवानी ही परदेशात गेली असावी अशी शक्यता पोलिस विभागाकडून व्यक्त केली जात आहे.

Ambadas Danve : जो न्याय खडसेंना तोच पार्थ पवारांना का नाही ? जमीन घोटाळ्यावरून अंबादास दानवे आक्रमक

यासंदर्भात इमिग्रेशन विभागाला बावधन पोलिसांकडून पत्र पाठवलं जाऊ शकतं. मात्र सध्या शीतल तेजवानी ही फरार असल्याचं बोललं जात आहे. या जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानी , दिग्विजय पाटील आणि रवींद्र तारूंविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बावधन पोलिसांकडून या तिघांचाही शोध घेतला जात आहे. त्यासाठी वेगवेगळी पथकांची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. बावधन पोलिसांकडून या सर्व प्रकरणाचा कसून तपास केला जात आहे.  शीतल तेजवानी हिला लवकरता लवकर अटक होते का, पोलिसांकडून या प्रकरणात काय कारवाई केली जाते, ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.