खासदार राहुल शेवाळे यांचीही एसआयटी चौकशी होणार? आमदार मनीषा कायंदे यांची मागणी काय? सभापती गोऱ्हे काय म्हणाल्या?
आमदार मनीषा कायंदे यांनी खासदार राहुल शेवाळे यांच्यावर झालेल्या आरोपाची एसआयटी चौकशी व्हावी अशी मागणी केल्याने विरोधक चांगलेच एकवटले होते.

नागपूर : दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची एसआयटी चौकशीची पुन्हा मागणी सभागृहात केल्यानं अनेक वेळेला विधानसभा आणि विधानपरिषद असे दोन्हीही सभागृह अनेकदा तहकूब करण्याची वेळ आली. यामध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची एसआयटी चौकशी होणार असल्याचे जाहीर केले. आमदार आदित्य ठाकरे यांना याबाबत घेरण्यासाठी सत्ताधारी पक्षातील भरत गोगावले, नीतेश राणे, प्रवीण दरेकर यांच्यासह अनेक महिला आमदारांनी ही मागणी लावून धरली होती. त्यामुळे विरोधकांनी यावर बोलण्यासाठी विनंती करूनही वेळ न दिल्याने विधानपरिषदेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी थेट शिंदे गटाच्या खासदाराचा मुद्दा हाती घेतला आहे. राहुल शेवाळे यांच्यावर अत्याचाराचे आरोप केलेल्या महिलेला मुंबईत यायचे आहे, तिला येऊ दिले जात नाही, अत्याचार आणि बलात्काराचे आरोप असतांनाही कारवाई होत नसल्याने मनीषा कायंदे यांनी याबाबत विधानपरिषदेत ही मागणी लावून धरली होती.
आमदार मनीषा कायंदे यांनी खासदार राहुल शेवाळे यांच्यावर झालेल्या आरोपाची एसआयटी चौकशी व्हावी अशी मागणी केल्याने विरोधक चांगलेच एकवटले होते.
विधानपरिषदेत दोन्ही बाजूकडून गोंधळ सुरू असल्याने विधानसभेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी गोंधळ शांत करण्यासाठी आपल्या अधिकाऱ्यांचा वापर करत असल्याचे म्हंटले होते.
यामध्ये मनीषा कायंदे यांनी केलेली मागणीवरुन सरकारकडून एसआयटी चौकशीची बाबत ठोस उत्तर दिले जात नसल्याने नीलाम गोऱ्हे यांनी आपल्या अधिकाराचा वापर करत सरकारला निर्देश दिले आहे.
विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी खासदार राहुल शेवाळे यांच्याबाबत जे आरोप करण्यात आले आहे, त्याबाबत सदस्यांनी केलेल्या मागणीनुसार एसआयटी चौकशी करण्याचे निर्देश देत असल्याचे म्हंटले आहे.
एकूणच आता सभापती यांनी दिलेल्या निर्देशाचे सरकार पालन करेल का? राहुल शेवाळे यांचीही चौकशी सुरू होईल का? दिशा सालियन मृत्यू प्रकरणाबरोबरच राहुल शेवाळे यांचीही एसआयटी चौकशी सुरू होते का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
