
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी आज भाजपची प्रचारसभा पार पडली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार भाषण केले. या महापालिकेत गेल्या काही काळापासून भाजत आणि राष्ट्रवादीचे नेते एकमेकांवर सतत टीका करत आहेत. आमदार महेश लांडगे आणि अजित पवार यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलेले आहे. या प्रकणावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुनावलं आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
पिंपरी चिंचवडमधील सभेत बोलताना आमदार महेश लांडगे म्हणाले की, ‘काही लोक एसआरए अर्थात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी नागरिकांना धमकी देतायेत. जणू हे स्वतःच्या जागेवर घरं बांधत आहेत. हे सगळं इथला एक नेता आहे, त्याला वाटतं तो एसआरए चा बाप आहे. तो जे करतोय ते चुकीचं आहे. तो स्वतःला बाप समजतात, त्यांना जागा दाखवायला हवी. जे एसआरए मध्ये जे घुसलेत त्यांना खूप माज आहे. देवा भाऊ त्यांचा बंदोबस्त लावावा लागेल.’
पुढे बोलताना आमदार लांडगे यांनी, ‘ज्यांनी (अजित पवार) आमच्यावर चुकीच्या पद्धतीने आरोप केले, त्यांना दोन दिवसांत उत्तर दिलय. भाऊ युतीत फक्त भाजपने इतरांचा सन्मान करायचा का? देवा भाऊ हे खोटं नरेटिव्ह पसरवत आहे. माझी त्यांच्या इतकी उंची नाही. माझी तेवढी कुवत नाही. माझ्यावर शिंतोडे उडवत आहे. याद्वारे भाजपला बदनाम करत आहेत. आम्हाला म्हणतात की माझे राज्यातील आणि केंद्रातील नेत्यांशी माझे संबंध आहेत, त्यांच्याशी चांगलं जमतं असं सांगतायेत आणि स्वतःचे आरोप लपवून ठेवतायेत. देवा भाऊ आज पिंपरी चिंचवड करांना स्पष्ट कळू द्या.
आमदार महेश लांडगेंच्या भाषणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण करताना म्हटले की, ‘आमचे महेश लांडगे जरा वैतागले होते, कारण निवडणुका आल्या की अनेकांना कंठ फुटतो. अनेक जण आरोप करतायेत. मात्र मी सांगू इच्छितो की…. परिंदे में मिलेगी मंजिल एकदिन, ये उनके फैले हुवे पंख बोलते है. ओर वही लोग खामोश रहते है अखसर, जमाने मे जिनके हुनर बोलते है.’
पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी, ‘आपलं काम बोलतयं, त्यामुळं हा वैताग आहे. हा त्रागा आहे, हा राग राग आहे. जरा समजून घ्या दादा, ते रागावले म्हणून तुम्ही रागावू नका. त्यांना सांगायला काम नाही. त्यांना अनेक प्रश्न विचारले जातात, त्यांच्याकडे उत्तरं नाहीत. त्यामुळं त्यांना आरोप-प्रत्यारोपात ही निवडणूक गुंतवून ठेवायची आहे. पण आपण विकासाच्या मुद्यावर बोलत रहायला हवं. म्हणजे आरोप-प्रत्यारोप करत बसण्याची वेळ येणार नाही असं अजित दादांना सुनावलं आहे.’