AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फडणवीस व एकनाथ शिंदेंना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न, माजी महासंचालकांचा प्रताप उघड; अहवालातील धक्कादायक माहितीने महाराष्ट्र हादरला

Fadnavis and Shinde : ठाण्यातील एका खोट्या गुन्ह्यात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना गोवण्याचा प्रयत्न झाल्याचा अहवाल समोर आला आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

फडणवीस व एकनाथ शिंदेंना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न, माजी महासंचालकांचा प्रताप उघड; अहवालातील धक्कादायक माहितीने महाराष्ट्र हादरला
fadnavis shinde and pandeyImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Jan 10, 2026 | 4:17 PM
Share

राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. ठाण्यातील एका खोट्या गुन्ह्यात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना गोवण्याचा प्रयत्न झाल्याचा अहवाल समोर आला आहे. मीरा भाईंदरच्या एका प्रकरणात फडणवीस आणि शिंदेंना त्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी माजी पोलीस महासंचालक संजय पांडेंनी दबाव आणला असल्याचा चौकशी अहवालात खुलासा झाला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात हा प्रयत्न झाला होता. त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते होते. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

फडणवीस व एकनाथ शिंदेंना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न

माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. राज्याच्या निवृत्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी निवृत्तीच्या पाच दिवस आधी सरकारकडे याबाबतचा अहवाल सोपवला आहे . या अहवालात माजी पोलीस महासंचालक संजय पांडे, पोलीस उपयुक्त लक्ष्मीकांत पाटील आणि एसीपी सरदार पाटील या तिघांवर गुन्हा दाखल करण्याची शिफारस विशेष तपास पथकाने केली आहे. त्यामुळे आता पोलिस काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

संजय पांडे यांच्यावर कुणाचा दबाव होता? शेलार यांचा सवाल

या प्रकरणावर बोलताना भाजपचे नेते आशिष शेलार म्हणाले की, ‘जो प्रकार समोर आला तो तपास यंत्रणांनी आणला. संजय पांडे यांच्यावर कुणाचा दबाव होता? आदेश कोणी दिला? त्यावेळी मुख्यमंत्री गृहमंत्री कोण होतं? देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना तुरुंगात टाकन्यासाठी हे केलं. भोळी सुरत दिलं के खोटे अशी प्रतिमा उद्धव ठाकरे तुमची. याचं पाप भोगावं लागेल. पोलिसांच्या मागे पोलीस अशी परिस्थिती उद्धव ठाकरे यांच्या काळात सुरू होती.

फडणवीस व शिंदेंवर गुन्हा दाखल करण्यासाठी खोटी कागदपत्रे तयार केली – साटम

भाजपचे नेते अमित साटम यांनी म्हटले की, ‘2019 ते 2022 काळात उद्धव मामू मुख्यमंत्री असताना अराजकतेच वातावरण या महाराष्ट्रात माजवलं गेलं होतं. विरोधकांना जेलमध्ये टाकणं, जे आपल्या विरुद्ध बोलतात त्यांच्यावर केसेस करणं, पोलिसांकडून मर्डर करून घेणं, हल्ले करणे अशा प्रकारची राजवट आपण बघितली. त्याचाच एक जिवंत उदाहरण महाराष्ट्र जनतेच्या समोर आल आहे. संपूर्ण न्यायव्यवस्थेला जुगारून दबाव आणून आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गुन्हा नोंदविण्याकरता खोटे कागदपत्र , चित्रफित तयार करण्याचं काम संजय पांडे यांनी केलं. हे आज उघडकीस आलं आहे. महाराष्ट्राच्या डीजीपी यांनी आम्ही पत्र लिहिलेल आहे. या पत्रात संपूर्ण कहाणी दिलेली आहे. संजय पांडे यांच्यावर गुन्हा नोंदवण्याची सूचना सुद्धा या पत्रात केली आहे.’

बदलापूर सहआरोपी तुषार आपटे भाजपचा स्वीकृत नगरसेवक; संतापानंतर राजीनामा
बदलापूर सहआरोपी तुषार आपटे भाजपचा स्वीकृत नगरसेवक; संतापानंतर राजीनामा.
डोळ्यात अश्रू नाही तर अंगार... उद्धव ठाकरेंची स्फोटक मुलाखत
डोळ्यात अश्रू नाही तर अंगार... उद्धव ठाकरेंची स्फोटक मुलाखत.
दादा-ताई एकत्र, पुण्यात मेट्रो-बस फ्री! दादांच्या घोषणेवर BJPचा आक्षेप
दादा-ताई एकत्र, पुण्यात मेट्रो-बस फ्री! दादांच्या घोषणेवर BJPचा आक्षेप.
ठाकरे गटाचे दगडू सकपाळ शिंदेसेनेत, निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोड
ठाकरे गटाचे दगडू सकपाळ शिंदेसेनेत, निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोड.
भाजपचं बेगडी हिंदुत्व, दानवेंकडून रावसाहेब दानवेंचा जुना व्हिडीओ ट्वीट
भाजपचं बेगडी हिंदुत्व, दानवेंकडून रावसाहेब दानवेंचा जुना व्हिडीओ ट्वीट.
भाजप आमदाराची भरसभेत थेट फडणवीसांकडे अजितदादांची तक्रार, म्हणाले...
भाजप आमदाराची भरसभेत थेट फडणवीसांकडे अजितदादांची तक्रार, म्हणाले....
जिसे लढना ना मालूम वह तीर तलवार क्या जाने, गुलाबराव पाटलानी सभा गाजवली
जिसे लढना ना मालूम वह तीर तलवार क्या जाने, गुलाबराव पाटलानी सभा गाजवली.
उद्धव ठाकरेंनी घोटाळे करुन मुंबईला लुटलं... एकनाथ शिंदेंनी वाचला पाढाच
उद्धव ठाकरेंनी घोटाळे करुन मुंबईला लुटलं... एकनाथ शिंदेंनी वाचला पाढाच.
ठाकरे म्हणाले अश्रू नव्हे हे अंगार! उद्धव ठाकरेंच्या डोळ्यात का पाणी?
ठाकरे म्हणाले अश्रू नव्हे हे अंगार! उद्धव ठाकरेंच्या डोळ्यात का पाणी?.
खोट्या गुन्ह्यात फडणवीस-शिंदेंना गोवण्याचा प्रयत्न; अहवालातून मोठी...
खोट्या गुन्ह्यात फडणवीस-शिंदेंना गोवण्याचा प्रयत्न; अहवालातून मोठी....