Devendra Fadnavis: रखरखत्या उन्हात मनोज जरांगेंचं आंदोलन… मुख्यमंत्र्यांची मोठी प्रतिक्रिया…. जरांगे उपोषण मागे घेणार?
Devendra Fadnavis big reaction on Manoj Jarange Hunger Strike: अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे त्यांच्याशी चर्चा करत आहेत. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी प्रतिक्रिया समोर आली आहे.

Devendra Fadnavis on Manoj Jarange Hunger Strike: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सध्या त्यांच्याशी चर्चा करत आहेत. भर उन्हात जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. त्यावरून राज्यात पडसाद उमटत आहेत. या आंदोलनाची राज्यभर चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे पाटील यांच्या उपोषणाविषयी मोठे आवाहन केले आहे.
सरकारची सकारात्मक भूमिका
सरकार या प्रश्नावर सकारात्मक आहे. सरकारने वारंवार निर्णय घेतला. अडचणी आली त्या त्यावेळी निर्णय घेतला आहे. सरकारची भूमिका पारदर्शक आहे. सकारात्मक आहे. आम्ही ती मांडत आहे. आमची भूमिका यापुढेही सरकारची भूमिका सकारात्मक आहे. आमचं सरकार सर्व समाजासाठी सकारात्मक काम करत आहे. समाजांना एकमेकांसमोर आणून भांडण करत नाही. सर्वांचं भलं कसं होईल हा प्रयत्न करतो , अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
आमच्याच सरकारने मोठे निर्णय घेतले
मराठा समाजाच्या संदर्भात पुन्हा एकदा सांगतो, जेवढे निर्णय मी घेतले, शिंदे यांनी घेतले तेवढे इतिहासात कधी झाले नाही. हे निर्णय घेत असताना संविधान, हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाचं पालन करावं लागेल. त्या निर्देशाचं पालन न करता निर्णय घेतला तर फक्त प्रसिद्धी मिळेल, त्यातून काही मिळणार नाही. त्यामुळे संविधान आणि न्यायालयाच्या निर्णयाच्या कसोटीवर खरे ठरणारे जे जे निर्णय असतील ते घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
ओबीसींनी घाबरण्याचे कारण नाही
एका समाजाचं काढून दुसऱ्याला द्यायचं असं आम्ही केलं नाही. करणार नाही. ओबीसींनी घाबरण्याचं कारण नाही, त्यांचंही समाधान करू. आम्ही निर्णय घेऊ, पण ओबीसींवर अन्याय करणार नाही. जीआरबाबत चर्चा सुरू आहे. डिटेल बोलणार नाही. न्यायालय, संविधानाच्या चौकटीत बसून कोणताही निर्णय घ्यायला तयार आहोत, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तर दुसरीकडे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यांनी सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती त्यांना दिली आणि उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र त्यावर जरांगे पाटील तयार झालेले नाहीत. सावलीत उपोषण करण्याची मागणी ही त्यांनी मान्य केली नाही.