AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फडणवीसांना शिव्या द्या, मला सवय, मी शिव्या प्रुफ; पण… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गर्भित इशारा

मिसिंग लिंकचा इतिहासची असाच आहे. आघाडीचे सरकार होते. त्या आघाडीच्या सरकारमध्ये मिसिंग लिंकचा प्रस्ताव तयार झाला. तेव्हा आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनी दोन पानी नोट लिहून 14 कारणं दिली आणि मिसिंग लिंकची फाईल बंद केली, अशी टीका फडणवीस यांनी केली.

फडणवीसांना शिव्या द्या, मला सवय, मी शिव्या प्रुफ; पण... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गर्भित इशारा
devendra fadnavis speechImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 08, 2026 | 2:26 PM
Share

Devendra Fadnavis Speech : पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली. सध्या राज्यात तुफान पाऊस सुरू आहे. पुणे, मुंबई, नाशिक या शहरांना पावसाने झोडपून काढले आहे. यामुळे जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले आहे. पुणे आणि मुंबईला जोडणार मिसिंग लिंक म्हणजेच कनेक्टिंग लिंकवर दरड कोसळल्यामुळेही बराच गदारोळ झाला. विरोधकांनी मोठे आरोप केले. दरम्यान, आता याच सर्व आरोपांना फडणवीस यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.

तेव्हा मधू दंडवते होते म्हणून…

कनेक्टिंग लिंकचा विषय खूपच गाजला. या कनेक्टिंग लिंकबाबत विरोधकांनी केलेला सगळा खोटारडेपणा बाहेर आला. महायुती सरकारची हिम्मत होती म्हणूनच आम्ही कनेक्टिंग लिंक बांधून दाखवला. ज्या वेळी कोकण रेल्वे बांधायची वेळ आली, तेव्हा लोक असंच म्हणायचे की ही रेल्वे चालू शकणार नाही. या भागात दरड कोसळते असे सांगितले जायचे. परंतु तेव्हा मधू दंडवते या व्यक्तीमध्ये हिम्मत होती. त्यांनी ही रेल्वे बांधून दाखवली. त्यानंतर दरवर्षी दरड कोसळायची. परंतु त्यातून आपण शिकायचो. दरड कोसळणं बंद करायचो. भीतीने कोकण रेल्वे तयार केली नसती तर काय अवस्था राहिली असती.

आपण कनेक्टिंग लिंक तयार करून दाखवला

मिसिंग लिंकचा इतिहासची असाच आहे. आघाडीचे सरकार होते. त्या आघाडीच्या सरकारमध्ये मिसिंग लिंकचा प्रस्ताव तयार झाला. तेव्हा आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनी दोन पानी नोट लिहून 14 कारणं दिली आणि मिसिंग लिंकची फाईल बंद केली. पण आम्ही निर्णय केला की मिसिंग लिंक बांधायचाच. आपण हे करू शकतो, असं समजलं. आता आपण ते करून दाखवलं. आपण कनेक्टिंग लिंक तयार करून दाखवला. जगातला सगळ्यात रुंद बोगदा आपण तयार करून दाखवला. भारतातला सर्वात केबल स्ट्रेड ब्रिज आपण तयार करून दाखवला, असं देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं.

मी शिव्या प्रुफ आहे, पण…

तसेच आपल्या भाषणात बोलताना त्यांनी फडणवीसांना म्हणजेच मला शिव्या द्या. मला त्याची सवय आहे. मी शिव्या प्रुफ आहे. पण महाराष्ट्राला बदनाम कराल तर मी सोडणार नाही, असा गर्भित इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक