AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

म्हणूनच ठाकरेंच्या पक्षाची अधोगती, त्यांनी रोज रामरक्षा… ठाकरे गटाच्या आंदोलनावरून फडणवीसांची बोचरी टीका!

उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत अयोध्येतील राम मंदिर आर्थिक घोटाळ्यावरून भाजपावर सडकून टीका केली. तसेच रविवारी (5 जुलै) मुंबईतील दादरमधील कबुतरखान्याजवळ आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.

म्हणूनच ठाकरेंच्या पक्षाची अधोगती, त्यांनी रोज रामरक्षा... ठाकरे गटाच्या आंदोलनावरून फडणवीसांची बोचरी टीका!
devendra fadnavis and uddhav thackerayImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 05, 2026 | 3:10 PM
Share

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षात सहा खासदारांनी बंडखोरी केली. त्यानंतर ठाकरे कुटुंबाचे विश्वासू मानले जाणारे सचिन अहिर यांनीही ठाकरेंची साथ सोडत शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला. आता लवकरच काही आमदार ठाकरेंची साथ सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षात जाणार आहेत, असा दावा केला जातोय. या सर्व घडामोडीमुळे ठाकरेंच्या पक्षात सध्या अस्थिरता आहे. पक्षाला पुन्हा एकदा उभारी मिळावी, कार्यकर्त्यांना बळ मिळावे यासाठी ठाकरे राज्यभर फिरत आहेत. आथा ठाकरेंनी अयोध्येतील राम मंदिरात झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहाराविरोधात दंड थोपटले आहेत. त्यांनी मुंबईत आंदोलन करण्याचे जाहीर केले आहे. याच आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

राम भक्तांनी आंदोलनात सहभागी व्हावे

उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत अयोध्येतील राम मंदिर आर्थिक घोटाळ्यावरून भाजपावर सडकून टीका केली. तसेच रविवारी (5 जुलै) मुंबईतील दादरमधील कबुतरखान्याजवळ आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. या भागात एक रा मंदिर आहे. याच राम मंदिराजवळ समस्त राम भक्तांनी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन ठाकरे यांनी केले आहे. ठाकरेंच्या याच आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. ठाकरेंच्या पक्षाची शकलं का झाली, याचं कारणही त्यांनी सांगितलं आहे.

म्हणूनच त्यांच्या पक्षाची अधोगती झाली

देवेंद्र फडणवीस आज चंद्रपूरच्या दौऱ्यावर होते. यावेळी फडणवीस यांना ठाकरेंच्या आंदोलनावर प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना शेवटी उद्धवजींना राम आठवले आहेत. आमची अपेक्षा एवढीच होती की त्यांना राम आठवले पाहिजेत. त्यांनी रामाचा मार्ग सोडला होता, म्हणूनच त्यांच्या पक्षाची अधोगती झाली, असा खोचक टोला फडणवीस यांनी लगावला.

ठाकरेंच्या आंदोलनात नेमकं काय होणार?

तसेच, राममार्गाने चालले तर त्यांचं भलं होईल. त्यांनी आजच्या पुरतीच नव्हे तर रोज रामरक्षा म्हणावी अशी माझी अपेक्षा आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला. दरम्यान, आता ठाकरेंनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपा आणि केंद्र सरकारला घेरलं आहे. त्यामुळे ठाकरेंच्या आंदोलनात नेमकं काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी अपडेट! कृषीमंत्री माध्यमांसमोरच म्हणाले...
Dattatray Bharne | शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी अपडेट! कृषीमंत्री माध्यमांसमोरच म्हणाले...
राज्यात मुसळधार पावासाचा आणखी एक बळी, CCTV तून धक्कादायक माहिती समोर
Kurla | राज्यात मुसळधार पावासाचा आणखी एक बळी, CCTV तून धक्कादायक माहिती समोर
काय राहिलंय आता? ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावताच भाजप नेत्याचं ते विधान
काय राहिलंय आता? राहिलेत ते... ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावताच भाजप नेत्याचं ते विधान चर्चेत
मोठी बातमी! ठाण्यातील नामांकित शाळेची भिंत कोसळी, सर्वत्र भीतचं...
Thane | मोठी बातमी! ठाण्यातील नामांकित शाळेची भिंत कोसळी, सर्वत्र भीतचं वातावरण
पावसात झाडांची दहशत! वादळी वाऱ्यासह होणऱ्या पावासामुळे सतत पडझड
Mumbai | पावसात झाडांची दहशत! वादळी वाऱ्यासह होणऱ्या पावासामुळे सतत पडझड
जिल्हा बँकेंच्या निवडणुकीत मोठं घडतंय! महायतीतून अर्ज भरणाऱ्या दानवेंच
जिल्हा बँकेंच्या निवडणुकीत मोठं घडतंय! महायतीतून अर्ज भरणाऱ्या अंबादास दानवेंचा विजय की पराभव?
मोठा पूर! 33 हजार 408 क्युसेकने विसर्ग सुरू, महाराष्ट्रातील पवित्र नदी
मोठा पूर! 33 हजार 408 क्युसेकने विसर्ग सुरू, महाराष्ट्रातील पवित्र नदीचा धडकी भरवणारा Video
मविआ'तील गळती काही थांबेना! पद, 20 कोटी अन्... बड्या नेत्याच्या दाव्या
मविआ'तील गळती काही थांबेना! पद, 20 कोटी अन्... बड्या नेत्याच्या दाव्याने एकच खळबळ
अखेर शिंदेंनी दिलेला शब्द पाळला! प्रकृती ठिक नसतानाही थेट काश्मीरमध्ये
अखेर शिंदेंनी दिलेला शब्द पाळला! प्रकृती ठिक नसतानाही थेट काश्मीरमध्ये पोहोचवली मदत
सचिन अहिर यांनी पक्ष प्रवेश करताच मुलीची प्रतिक्रिया, थेट आदित्य ठाकरे
सचिन अहिर यांनी पक्ष प्रवेश करताच मुलीची प्रतिक्रिया, थेट आदित्य ठाकरेंवर... नेमकं काय म्हणाली?