
Devendra Fadnavis : येत्या 15 जानेवारी रोजी राज्यात महापालिका निवडणुकीसाठी मतदान होईल. त्यानंतर लगेच 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर केला जाईल. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने अत्यंत विचारपूर्व प्लॅनिंग केले आहे. रणनीतीचा भाग म्हणून राज्यात ज्या शहरात महापालिकेची निवडणूक आहे, तिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुलाखतींचं आयोजन केले जात आहे. पुण्यातही 11 जानेवारी रोजी अशीच एक मुलाखत आयोजित करण्यात आली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याचा विकास, पुण्याची मेट्रो, पुण्याचे रस्ते यासारख्या अनेक विषयांवर भाष्य केले. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या या मुलाखतीत फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मित्र म्हणून उल्लेख केला आहे. मित्र म्हणत फडणवीसांनी ठाकरेंवर टोलेबाजी केली आहे.
मुंबईत मेट्रो करताना लोकांचा प्रॉब्लेम नव्हता. आमचे मित्र उद्धव ठाकरे यांनाच अडचण होती. आरे कॉलनीत झाडे कापण्यास त्यांचा विरोध होता. आम्ही त्यांना समजावलं. त्यांनी ऐकलं नाही. आम्ही कोर्टात गेलो. काम सुरू झालं. पण तेवढ्यात सरकार गेलं. ठाकरे आले त्यांनी त्या कामाला स्थगिती दिली, असे यावेळी फडणवीस यांनी सांगितले.
तसेच, आरेच्या कामाबाबत समितीचा रिपोर्ट आला की ही आरेची जागा रिझर्व्ह फॉरेस्टची जागा नाही. इथे इमारती बांधल्या आहेत. पण ठाकरेंनी ऐकलं नाही. आम्ही परत कोर्टात गेलो. कोर्टाने त्याला मान्यता दिली. पुन्हा सरकार आल्यावर सुप्रीम कोर्टाच्या आधारावर स्थगिती हटवली. जी अंडरग्राऊंड मेट्रो साडे तीन वर्षात केली ती तीन वर्षाने पुढे गेली. त्यामुळेच निर्मिती खर्च १० हजार कोटींची झाली. आम्ही दहापट झाडेही लावली. त्याचा रिपोर्टही दिला. ती झाडे मोठी झाली. त्याचे फोटो दिले. पण केवळ इगोसाठी त्यांनी हे केलं, आसा आरोप फडणीसांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला.
इतर मेट्रोसाठी त्रास झाला नाही. कारण आम्ही वॉर रूम तयार केली होती. सर्व ऑथेरिटींना एकत्र बसवायचो आणि त्यांच्याकडून परवानगी घ्यायचो, असेही त्यांनी सांगितले.