Devendra Fadnavis : आमचे शेकडो कार्यकर्ते मारून टाकले, मारून टाकले, फडणवीसांचे ठाकरे सरकारला ‘जशास तसे’ उत्तर देण्याची घोषणा

आमचे शेकडो कार्यकर्ते मारून टाकले. होय, मारून टाकले. मी तुम्हाला यानिमित्ताने स्पष्टपणे सांगू इच्छितो की, केरळ आणि बंगालमध्ये आमचे शेकडो लोक-कार्यकर्ते मारून टाकले. तरीही आम्ही गप्प बसलो नाही. आम्ही संघर्ष केला. हा तर महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. इथे आमची ताकदही तेवढीच आहे. आम्हीही जशास तसे उत्तर देऊ, असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस (Devendra Fadnis) यांनी सोमवारी महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री (CM) आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.

Devendra Fadnavis : आमचे शेकडो कार्यकर्ते मारून टाकले, मारून टाकले, फडणवीसांचे ठाकरे सरकारला 'जशास तसे' उत्तर देण्याची घोषणा
देवेंद्र फडणवीस.
Follow us
| Updated on: Apr 25, 2022 | 4:19 PM

मुंबईः आमचे शेकडो कार्यकर्ते मारून टाकले. होय, मारून टाकले. मी तुम्हाला यानिमित्ताने स्पष्टपणे सांगू इच्छितो की, केरळ आणि बंगालमध्ये आमचे शेकडो लोक-कार्यकर्ते मारून टाकले. तरीही आम्ही गप्प बसलो नाही. आम्ही संघर्ष केला. हा तर महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. इथे आमची ताकदही तेवढीच आहे. आम्हीही जशास तसे उत्तर देऊ, असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस (Devendra Fadnis) यांनी सोमवारी महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री (CM) आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. फडणीस म्हणाले की, विरोधी पक्षाला जीवानिशी संपवायची प्रवृत्ती या सरकारची आहे. सरकारी पक्षाचे लोक पोलीस संरक्षणात आमच्या पदाधिकाऱ्यांना जीवे मारण्याकरिता पोलीसांच्या समक्ष हल्ले करणार करतात. त्यानंतर एफआयआर नोंदवण्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागतो. महाराष्ट्रात अशी परिस्थिती कधी नव्हती. विरोधी पक्ष भ्रष्टाचारावर बोलतो म्हणून त्याच्यावर हल्ला करतात. पोलखोल यात्रेतून सगळा भ्रष्टाचार जनेतमसोर मांडला. ज्यांना लोकशाही मान्य नाही, त्यांनी पोलखोल सभा, रथांवर हल्ला केला. त्यांना असे वाटते की, असे हल्ले करून आम्ही भ्रष्टाचाराविरोधात बोलणे बंद करू. मात्र, हा गैरसमज त्यांनी मनातून काढून टाकावा. भ्रष्टाचारविरोधात लढाई सुरू राहील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून हल्ले

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी भोंगा प्रश्नावर सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र, त्याकडे विरोधकांनी पाठ फिरवली. त्यानंतर बोलताना फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतली. ते म्हणाले, किरीट सोमय्यांवर हल्ला झाला. झेड सिक्युरिटीला तोडून मारले जाते. मोहित कंबोज यांच्यावर तर मॉब लिंचिंग करण्याचा प्रयत्न झाला. हे राज्यभर होते आहे. भाजपच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांविरोधात ठरवून केले जात आहे. दरेकरांचं तेच झालं. पोलिसांचा दुरुपयोग मोठ्या प्रमाणात होत चालला आहे. यांची एकही केस टिकली नाही, टिकूही शकत नाही आणि गृहमंत्र्यांच्या बैठकीला जाऊन फायदा तरी काय? या गृहमंत्र्यांना काही अधिकार तरी आहे का? हे सगळे मुख्यमंत्र्याच्या आदेशाने चालले आहे, असा आरोप त्यांनी केला.

नवनीत राणांना हीन वागणूक

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना अटक केली. त्यानंतर त्यांना कस्टडीमध्ये हीन वागणूक दिल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. ते म्हणाले, मातोश्री बाहेर हनुमान चालिसा वाचण्याचा इशारा नवनीत राणा आणि रवी राणा यांनी दिला होता. त्यानंतर मोठा गदारोळ मुंबईत पाहायला मिळाला. खार येथील राणा यांच्या निवासस्थानी शनिवारी शिवसैनिकांनी हल्लाबोल केला होता. दुपारी राणांनी मातोश्रीवर न जाण्याचे स्पष्ट केले. त्यानंतर संध्याकाळी राणा दाम्पत्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, नवनीत राणा यांना भायखळ्यातील कोठडीत ठेवण्यात आले. शनिवार आणि रविवारची रात्र कोठडीत घालवलेल्या नवनीत राणा यांना कस्टडीत हीन वागणूक देण्यात आली. नवनीत राणा यांना पिण्याचे पाणी दिले नाही. त्यांना वॉशरुमला जायचे होते, ते जाऊ दिले नाही, असा घणाघाती आरोप फडणवीस यांनी केला.

इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

Non Stop LIVE Update
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात.
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?.
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.