AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘विरोधकांनी छातीवर हात ठेवून…’; फडणवीस आक्रमक, वक्फ संशोधन विधेयकावर पहिली प्रतिक्रिया

लोकसभेत अखेर आज वक्फ संशोधन विधेयक सादर करण्यात आलं आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

'विरोधकांनी छातीवर हात ठेवून...'; फडणवीस आक्रमक, वक्फ संशोधन विधेयकावर पहिली प्रतिक्रिया
| Updated on: Apr 02, 2025 | 5:40 PM
Share

लोकसभेत अखेर आज वक्फ संशोधन विधेयक सादर करण्यात आलं आहे. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी आज लोकसभेत वक्फ संशोधन विधेयक सादर केलं. वक्फ सुधारणा विधेयकावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी या विधेयकाच्या समर्थनार्थ मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता या  वक्फ संशोधन विधेयकावर प्रतिक्रिया देताना विरोधकांव जोरदार हल्लाबोल केला.

नेमकं काय म्हणाले फडणवीस?  

वक्फ बील पुर्णपणे पास होईल असा विश्वास आहे, सेक्युलर शब्दाचा प्रत्यय बिलातून पाहिला मिळत आहे. मुस्लिम महिलांना वक्फ बोर्डात स्थान मिळणार आहे. हे विधेयक कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही. धार्मिक आस्थांच्या विरोधातही हे विधेयक नाही. मागच्या बीलामध्ये ज्या चुका होत्या, त्यामुळे जमिनी लाटल्या जात होत्या. आता  ज्याची ज्याची सदविवेक बुद्धी जागृत आहेत ते या विधेयकांचं स्वागत करतील, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. विरोधक या संदर्भातील एकही पुरावा संसदीय समितीपुढे आणू शकले नाहीत, जेव्हा काहीही उरत नाही त्यावेळी अशा गोष्टी मांडल्या जातात. विरोधकांनी छातीवर हात ठेवून विचार केला तर लक्षात येईल की विरोधी पक्ष मताची लाचारी असल्यामुळे विरोध करत आहेत. मताच्या लांगुनचालनासाठी हे बिलाला विरोध करत आहेत असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना ठाकरे गटावर देखील प्रतिक्रिया दिली आहे.  बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा अंश त्यांच्यामध्ये बाकी असेल तर ते बिलाला विरोध करणार नाहीत. विधेयकाला समर्थन देतील अशी माझी अपेक्षा आहे. दरम्यान संजय राऊत यांच्याबद्दल प्रश्न विचारताच त्यांनी खोचक टोला लगावला आहे. माझ्या लेव्हलचे प्रश्न विचारत जा,  नाहीतर मला तुमच्या बुद्धीची कीव येते असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. मात्र दुसरीकडे विरोधकांकडून या विधेयकाला जोरदार विरोध होत असून, संसदेमध्ये गोंधळ पाहायला मिळत आहे.

Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी