AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकसभेत वक्फ संशोधन विधेयक सादर, शरद पवार गटाची भूमिका काय?

लोकसभेत सादर झालेल्या वक्फ संशोधन विधेयकावर राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र विरोध दर्शविला आहे. खासदार निलेश लंके यांनी या विधेयकातील तरतुदी धोकादायक असल्याचे म्हटले आहे. त्यांनी या विधेयकामुळे १.२ लाख कोटी रुपयांची जमीन सरकारकडे जाण्याची शक्यता वर्तविली.

लोकसभेत वक्फ संशोधन विधेयक सादर, शरद पवार गटाची भूमिका काय?
waqf bill sharad pawar
| Updated on: Apr 02, 2025 | 5:02 PM
Share

आज लोकसभेत वक्फ संशोधन विधेयक सादर करण्यात आले. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी आज लोकसभेत वक्फ संशोधन विधेयक सादर केलं. वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत सादर होत असताना मोठा गोंधळ झाला. यावेळी भाजप, शिवसेना शिंदे गट, तृणमूल काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट यांनी यावर प्रतिक्रिया दिली आता यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाने संसदेत भाषण करत या मुद्द्यावर त्यांचे मत मांडले. यावेळी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी भाषण करत प्रतिक्रिया दिली.

खासदार निलेश लंके यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आज आपण गप्प बसलो तर उद्यापासून एक एक समाज संपवला जाईल. सत्तेला नव्हे तर समाजाला मी उत्तरदाई आहे. या विधेयकातील तरतुदींना आम्ही विरोध करत आहोत, असे निलेश लंके म्हणाले. निलेश लंके यांनी मराठीत भाषण केले.

विधेयकामुळे अनेक अधिकार सरकारकडे जातील

या विधेयकात अनेक मुद्दे चिंताजनक वाटत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव राज्यातील सरकारने घेतलं, मात्र सत्ता घेतल्यावर ते विसरले. छत्रपती शिवाजी महाराज समाज, धर्म, पंथ न पाहता सगळ्यांना सोबत घेतलं. छत्रपती शिवजी महाराज यांनी सगळ्या धर्माला सन्मान दिला. या विधेयकामुळे अनेक अधिकार सरकारकडे जातील. 1.2 लाख कोटी रुपयांची जमीन सरकारकडे जाईल. वक्फ बोर्डाच्या अधिकारात सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न करावा, असे निलेश लंकेंनी म्हटले.

विधेयकातील तरतुदींना आम्ही विरोध

सायरस पूनावला, रतन टाटा हे पारशी समाजाचे आहेत, पण त्यांनी मोठं सामाजिक काम केलं. अजीम प्रेमजी, ए पी जे अब्दुल कलाम हे मुस्लिम समाजाचे आहे. मात्र त्यांनी मोठं काम केलं. आनंद ऋषी हे जैन समाजाचे मात्र त्यांनी आरोग्य क्षेत्रात काम केलं. 12 वर्ष एखाद्या जमिनीवर अतिक्रमण केलं, तर ती जमीन त्याची होईल. उद्या इतर समाजाच्या संस्थावर देखील हीच परिस्थिती येईल. भारत सर्वधर्म समभाव असलेला देश आहे. आज आपण गप्प बसलो तर उद्यापासून एक एक समाज संपवला जाईल, असेही निलेश लंके म्हणाले. सत्तेला नव्हे तर समाजाला मी उत्तरदाई आहे. या विधेयकातील तरतुदींना आम्ही विरोध करत आहोत. रघुपती राघव राजाराम म्हणत निलेश लंके यांनी भाषण संपवलं.

भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....