राणेंना नोटीस देणाऱ्या पोलिसांवरच FIR दाखल करा, अन्यथा आम्ही खटला दाखल करु-फडणवीस

65 वर्षावरील नागरिकांना पोलीस स्टेशनला बोलवता येत नाही, त्यांची साक्ष घरीच जाऊन घ्यावी लागते, त्यामुळे पोलिसांनी राणेंना साक्ष द्यायला बोलवून कायदा मोडला आहे, असा आरोप फडणवीसांनी केला आहे.

राणेंना नोटीस देणाऱ्या पोलिसांवरच FIR दाखल करा, अन्यथा आम्ही खटला दाखल करु-फडणवीस
देवेंद्र फडणवीस (विरोधीपक्ष नेते)
Follow us
| Updated on: Dec 30, 2021 | 5:36 PM

मुंबई : नितेश राणेंचा शोध घेत असताना नारायण राणे यांना पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोपांना उत आला आहे. या प्रकरणात सारखे नवे ट्विस्ट येत आहेत. महाविकास आघाडी सरकार राणेंना टार्गेट करत असल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे. अशाच वेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यात एक नवे ट्विस्ट आणले आहे. 65 वर्षावरील नागरिकांना पोलीस स्टेशनला बोलवता येत नाही, त्यांची साक्ष घरीच जाऊन घ्यावी लागते, त्यामुळे पोलिसांनी राणेंना साक्ष द्यायला बोलवून कायदा मोडला आहे, असा आरोप फडणवीसांनी केला आहे.

फडणवीसांचे ट्विट काय ?

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हटले आहे की, सिंधुदुर्ग पोलिसांनी कायदा पाळायचाच नाही, असे ठरवलेले दिसते! CRPC 160 ची नोटीस देणारे पोलिस जाणीवपूर्वक हे विसरले की 65 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीला पोलिस स्टेशनमध्ये साक्षीसाठी बोलविताच येत नाही. त्यांची साक्ष घरी जाऊनच घ्यावी लागते. केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांना नोटीस देऊन ठाण्यात साक्षीसाठी बोलावणे हा कायदेशीर अपराध आहे. त्यामुळे आता त्या पोलिस अधिकाऱ्यांवर IPC 166A अंतर्गत एफआयआर नोंदविला जावा, अशी आमची मागणी आहे. आणि असे न केल्यास भाजपा CRPC 156(3) अंतर्गत खटला दाखल करेल. तसेच हे जर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशाने केले असेल तर त्यांच्यावर सुद्धा IPC 34 अन्वये सहआरोपी बनविण्याची मागणी भाजपा करेल !

फडणवीसांच्या ट्विटमुळे नवे ट्विस्ट?

राज्यात आधीच एवढा पॉलिटिकल राडा सुरू असताना, देवेंद्र फडणवीसांनी असे ट्विट केल्याने आता हे प्रकरण वेगळे वळण घेण्याची शक्यतही निर्माण झाली आहे. कारण फडणवीसांनी थेट पोलिसांवरच आरोप केले आहेत. पोलिसांनीच कायदा पाळला नाही असा थेट आरोप फडणवीसांनी केलाय.

VIDEO | दोन कॉलेज युवतींची फ्री स्टाईल हाणामारी; एकमेकींच्या झिंज्या ओढल्या

Pune crime | पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई ; चाकण पोलीस स्थानकात ८५ हजारांची लाच घेताना एकाला रंगेहात पकडले

Salman Khan Birthday Gifts : सलमान खानला त्याच्या वाढदिवशी मिळाल्या करोडोंच्या भेटवस्तू, सर्वात महागडं गिफ्ट कोणी दिलं?

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.