फडणवीसांना धनंजय मुंडेंबद्दल विचारलं आणि ते सावध होत म्हणाले…

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठीही अशीच भूमीका घेणार का असं विचारल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी सावध भूमिका घेतल्याचं पाहायाला मिळालं. (devendra fadnavis dhananjay munde rape allegations)

फडणवीसांना धनंजय मुंडेंबद्दल विचारलं आणि ते सावध होत म्हणाले...
देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव समोर आल्यामुळे संजय राठोड (Sanjay Rathore) यांनी आपल्या वनमंत्रिपदाचा राजीनामा दिला. यावेळी संजय राठोड यांनी पहिल्याच दिवशी राजीनामा द्यायला होता, असं वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी केलं. मात्र, याच वेळी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्यासाठीही अशीच भूमीका घेणार का असं विचारल्यावर त्यांनी सावध भूमिका घेतल्याचं पाहायाला मिळालं. (Devendra Fadnavis soft stand on Dhananjay Munde rape allegations)

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याविषयी विचारल्यानंतर त्यांनी “भाजप आक्रमक आहे आक्रस्ताळा नाही,” अशी सावध प्रतिक्रिया दिली. त्यांच्या या उत्तरानंतर फडणवीसांचा धनंजय मुंडे यांच्या बद्दल असलेला सॉफ्ट कॉर्नर पुन्हा एकदा दिसला.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

संजय राठोड यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीमाना दिल्यानंतर सरकारला हे उशिराने सूचलेलं शहानपण असल्याची प्रतिक्रिया दिली. संजय राठोड यांच्यावरील आरोप हे गंभीर आहेत. अशा परिस्थितीत मंत्रिपदावर राहणं चुकीचं होतं. कुठेतरी आपल्याला वरिष्ठांचा आशीर्वाद असल्याने हा राजीनामा आला नाही. मुख्यमंत्री तो राजीनामा स्वीकारणार आहेत की नाही माहिती नाही?,” अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.

तसेच यावेळी भाजपने राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी जशी लावून धरली, तशीच भूमिका येत्या अधिवेशनात धनंजय मुंडे यांच्या प्रकरणात घेणार का?, असा प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला. यावेळी बोलताना फडणवीस यांनी अगदीच सावध प्रतिक्रिया दिली. “अशा प्रकारच्या जेवढ्या घटना असतील त्या सगळ्या प्रकरणात आम्ही आक्रमक भूमिका मांडणार. पण एक लक्षात ठेवा भाजप आक्रमक आहे. आक्रस्ताळा नाही. भाजप वस्तूस्थितीच्या आधारवर आंदोलन करतो,” असे फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया :

धनंजय मुंडे यांच्यावर कोणते आरोप?

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याविरोधात पार्श्वगायिका रेणू शर्मा या तरुणीने पोलिसात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. रेणू शर्मा यांच्या आरोपांनुसार 2006 पासून आपल्यावर अत्याचार सुरु आहे. बॉलिवूडमध्ये संधी मिळवून देण्याच्या नावाखाली इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला होता. या तक्रारीबाबत समाज माध्यम आणि प्रसारमाध्यमांवर वृत्त समोर आल्यानंतर स्वत: धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर या प्रकरणावर आपली भूमिका मांडली होती. या प्रकरानंतर राज्यात खळबळ उडाली होती. मात्र, नंतर 22 जानेवारी 2021 रोजी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला होता. त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा यांनी धनजंय मुंडेंविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली होती. कौटुंबिक कारणास्तव मी तक्रार मागे घेत आहे, असं रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितलं होतं. तशा प्रकारे पोलिसांना तिने लेखी लिहून दिलं होतं.

दरम्यान, 1 मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार आहे. या अधिवेशनात महाविकास आघाडीच्या नेत्यांवर झालेल्या बलात्काराच्या आरोपांवर भाजप काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

इतर बातम्या :

LIVE | पूजा चव्हाण प्रकरणाची दोषपूर्ण चौकशी व्हायला हवी : सुधीर मुनगंटीवार

ठाकरे मंत्रिमंडळातील पहिली विकेट, वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा

पूजा चव्हाणच्या आजी आल्या आता गुन्हा दाखल करा; तृप्ती देसाई यांची मागणी

(Devendra Fadnavis soft stand on Dhananjay Munde rape allegations)

Published On - 4:51 pm, Sun, 28 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI