AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…अन् फडणवीसांनी ‘या’ खास कारणासाठी मानले एकनाथ शिंदेंचे आभार, महायुतीच्या पत्रकार परिषदेत नेमकं काय घडलं?

महायुतीच्या नेत्यांनी आज राज्यपालांकडे सत्तास्थपानेचा दावा केला, या दाव्यानंतर महायुतीमधील प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली.

...अन् फडणवीसांनी 'या' खास कारणासाठी मानले एकनाथ शिंदेंचे आभार, महायुतीच्या पत्रकार परिषदेत नेमकं काय घडलं?
| Updated on: Dec 04, 2024 | 4:08 PM
Share

राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. उद्या नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. या पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आला आहे. आज देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता उद्या देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान त्यापूर्वी आज महायुतीचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी राज्यपालांकडे जाऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. यानंतर महायुतीची एक पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेला शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंद, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवार आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.

नेमकं काय म्हणाले फडणवीस? 

महायुतीकडून राज्यपालांना पत्र दिले आहे, नवीन सरकार स्थापन करण्यासाठी दावा केला आहे. राज्यपालांनी आम्हाला 5 तारीख 5 वाजताचा वेळ शपथविधीसाठी दिला आहे. राज्यपालांना महायुतीतल्या घटक पक्षांच्या सहीचे पत्र दिले आहे. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्या समर्थनार्थ पत्र दिले आहे, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

ते पुढे बोलताना म्हणाले की,  अजितदादानी देखील त्यांच्या आमदारांच्या पाठिंब्यांचे पत्र दिले आहे. मोदींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याला तिन्ही पक्षाचे नेते उपस्थित असणार आहेत. किती लोकांचा शपथविधी होणार याची माहिती आज संध्याकाळपर्यंत दिली जाईल. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपद आमच्यासाठी तांत्रिक बाब आहे, आतापर्यंत आम्ही तिन्ही मिळून निर्णय घेत आलो आहोत.  एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळात रहावं अशी मी त्यांना विनंती केली आहे. त्याल ते सकारात्मक प्रतिसाद देतील असं मला वाटतं. आम्ही जी आश्वासन दिली आहेत, ती आम्ही पूर्ण करू. बैठकीमध्ये इतर मंत्र्यांबाबत निर्णय घेऊ असं फडणवीस यांनी यावेळी म्हटलं.

Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी