AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीडचा नवा पालकमंत्री कोण? फडणवीसांचं मोठं वक्तव्य, चर्चेला उधाण

बीडचे नवे पालकमंत्री कोण असणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. या संदर्भात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

बीडचा नवा पालकमंत्री कोण? फडणवीसांचं मोठं वक्तव्य, चर्चेला उधाण
| Updated on: Dec 24, 2024 | 5:27 PM
Share

राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. त्यानंतर पाच डिसेंबरला नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर अधिवेशनाच्या एक दिवस आधी महायुतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मंत्र्यांना खात्याचं वाटप देखील करण्यात आलं. दरम्यान खाते वाटपानंतर आता सर्व राज्याचं लक्ष लागलं आहे ते म्हणजे पालकमंत्रिपदाच्या वाटपाकडे, महायुतीमध्ये अनेक जागांवर पालकमंत्रिपदावरून रस्सीखेच असल्याचं दिसून येत आहे.

सध्या बीड जिल्हा सर्वाधिक चर्चेमध्ये आहे, काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. यावरून सध्या वातावरण चांगलंच तापलं आहे. यातील काही आरोपींना अजूनही अटक करण्यात आलेली नाहीये. आरोपींना लवकरात लवकर अटक केली जाईल असं अश्वासन प्रशासनाकडून देण्यात आलं आहे. दरम्यान त्यानंतर आता बीडचे नवे पालकमंत्री कोण असणार याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

गेल्यावेळी धनंजय मुंडे हे बीडचे पालकमंत्री होते. यावेळीही त्यांनाच पालकमंत्रिपद मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता,  बीडचं पालकमंत्री पद कोणाला द्यायचं यासंदर्भात मी अजितदादा आणि एकनाथ शिंदे मिळून ठरवू असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच बीडमध्ये कोणाचीही दादगिरी आम्ही चालू देणार नाही असा इशाराही यावेळी फडणवीस यांनी दिला आहे.

दरम्यान दुसरीकडे काल पालकमंत्रिपदावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी देखील एक ट्विट केलं होतं. या ट्विटमुळे चर्चेला उधाण आलं आहे . अजितदादा तुम्ही पुण्याचं पालकमंत्री घेतलं तेव्हा आपण पुण्यातील कोयता गँगची दहशत संपवली, आता तुम्ही बीड आणि परभणीचं देखील पालकमंत्रिपद स्विकारा अशा अशायचं एक ट्विट मिटकरी यांनी केलं होतं. या ट्विटनंतर चर्चेला उधाण आलं आहे. गेल्यावेळी बीडचं पालकमंत्रिपद धनंजय मुंडे यांच्याकडे देण्यात आलं होतं, यावेळीही तेच पालकमंत्री होणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा