आई राजा उदो उदो: सप्तश्रृंगी गडावर भक्तांचा मेळा; दर्शनासाठी ‘या’ पाच ठिकाणी मिळतायत ऑनलाइन पास!

नवरात्रोत्सवात वणी येथील सप्तश्रृंगी गडावर देवीच्या दर्शनासाठी भाविक तुफान गर्दी करत आहेत. आजपर्यंत हजारो जणांनी देवीच्या चरणी मस्तक टेकवले असून, भक्तांसाठी पाच ठिकाणी ऑनलाइन पासची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

आई राजा उदो उदो: सप्तश्रृंगी गडावर भक्तांचा मेळा; दर्शनासाठी 'या' पाच ठिकाणी मिळतायत ऑनलाइन पास!
वणी येथील सप्तश्रृंगी देवी.
Follow us
| Updated on: Oct 10, 2021 | 5:10 PM

नाशिकः नवरात्रोत्सवात वणी येथील सप्तश्रृंगी गडावर देवीच्या दर्शनासाठी भाविक तुफान गर्दी करत आहेत. आजपर्यंत हजारो जणांनी देवीच्या चरणी मस्तक टेकवले असून, भक्तांसाठी पाच ठिकाणी ऑनलाइन पासची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

वणी येथील सप्तश्रृंगी देवी साडेतीन शक्तीपीठांपैकी एक. अनेकांचे आराध्य दैवत. प्रभू रामचंद्रापासून ते छत्रपती शिवरायांपर्यंत अनेकांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी. येथे दर्शनासाठी वर्षभर भाविकांची गर्दी असते. कोरोनामुळे राज्यभरातील मंदिर बंद होती. आता नवरात्रोत्सव आणि घटते रुग्ण पाहून हे निर्बंध उठवण्यात आले आहेत. वणी येथील मंदिर चोवीस तास उघडे आहे. मात्र, त्याासाठी भाविकांना ऑनलाइन पास सक्तीचा करण्यात आला आहे. सध्या देवळा, कळवण, अभोणा, वणी आणि नांदुरी या बसस्थानकावर ऑनलाइन पासची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. भाविकांची गर्दी वाढली तर ऑनलाइन पास काढण्याच्या जागा अजून वाढवण्यात येतील, अशी माहिती देण्यात आली आहे. मात्र, दुसरीकडे भाविकांना ऑफिलाइन पासची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनाही साकडे घातले आहे, अशी माहिती आमदार नितीन पवार यांनी दिली.

वयोवृद्धांनी येऊ नये

सप्तश्रृंगीगडावर देवीच्या दर्शनासाठी लसीचे दोन डोस आणि ऑनलाइन पास बंधनकारक करण्यात आला आहे. 65 वर्षावरील व्यक्ती, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला आणि लहान मुलांना या काळात गडावर येऊ नये, असे आवाहन मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात नांदुरी किंवा सप्तश्रृंगी गडावर यात्रा भरविण्यास बंदी आहे आणि गडावर खासगी वाहनांनाही परवानगी आहे. नांदुरीवरून जाण्यासाठी एसटीची व्यवस्था करण्यात आली आहे. गडावर मोठा पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

खासगी वाहनांना प्रवेश नाही

नवरात्रोत्सवाच्या काळात तसेच कोजागरी पौर्णिमेलाही 18 आणि 19 ऑक्टोबरला खासगी वाहनांना गडावर बंदी राहणार आहे. एसटीमध्ये पन्नास टक्के प्रवासी बसवून वाहतूक सुरू राहील. नांदुरी येथील बुथवरून ऑनलाइन पास शक्य असेल तरच मिळेल. पायी दर्शन करण्यासाठी बारा ठिकाणांहून दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे. कोविडच्या नियमानुसार या काळात फेनिक्यूलर ट्रॉली सुरू राहणार आहे. त्यात फेनिक्यूलरमधील भाविकांना 30 टक्के तर पायरीचे दर्शन घेणाऱ्यांना भाविकांना 70 टक्के प्राधान्य दिले जाणार आहे.

कोरोनाचे नियम कडक

नवरात्रोत्सवाच्या काळात वणीच्या गडावर लाखो भाविक दर्शनासाठी येतात. हे ध्यानात घेता कोरोनाचे नियम कडक पाळले जाणार आहेत. सुरक्षित अंतर ठेवणे, प्रत्येकाला मास्क वापरणे बंधनकारक असणार आहे. यात हयगय केल्यास प्रशासनाने कारवाईचा इशाराही दिला आहे. विशेषतः भाविकांनी बसचा वापर करावा. जास्त गर्दी टाळावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

पळवाटेला चाप

नाशिकमध्ये अजूनही कोरोना रुग्णांची आकडेवारी कमी होताना दिसत नाही. सिन्नर आणि निफाड तालुक्यामध्ये रुग्णांची वाढ सातत्याने सुरू आहे. कोरोना नियमांचे पालन कुठेही होताना दिसत नाही. मोठेमोठे खासगी कार्यक्रम जिल्ह्यात होताना दिसतायत. एखाद्या कार्यक्रमाला जेवणावळीसाठी फक्त शंभर जणांच्या उपस्थितीची परवानगी असेल, तर नागरिक दुपारी बारापर्यंत शंभर आणि सायंकाळी शंभर जणांना बोलवातयत. प्रत्येक नियमाला काही ना काही पळवाट आहे. अनेक जण मास्क घालत नाहीत. त्यामुळे रुग्णांची संख्या काही केल्या कमी व्हायला तयार नाही. हे पाहता नवरात्रोत्सवात कडक खबरदारी घेणे सुरू आहे.

इतर बातम्याः

नाशिकमध्ये बँक मॅनेजरने 14 लाख हडपले; ग्राहकाची पंचवटी पोलिस ठाण्यात धाव, गुन्हा दाखल

15 बाजार समित्यांचे जंगी इलेक्शन, 22 जानेवारीला मतदान; नाशिकमध्ये महाविकास आघाडीची मोट बांधणार का?

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.