15 बाजार समित्यांचे जंगी इलेक्शन, 22 जानेवारीला मतदान; नाशिकमध्ये महाविकास आघाडीची मोट बांधणार का?

नाशिक जिल्ह्यातील 23 ऑक्टोबरपर्यंत मुदत संपलेल्या 15 बाजार समित्यांची निवडणूक सहकार खात्याने जाहीर केली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघणार आहे.

15 बाजार समित्यांचे जंगी इलेक्शन, 22 जानेवारीला मतदान; नाशिकमध्ये महाविकास आघाडीची मोट बांधणार का?
कृषी उत्पन्न बाजार समिती, नाशिक.


नाशिकः नाशिक जिल्ह्यातील 23 ऑक्टोबरपर्यंत मुदत संपलेल्या 15 बाजार समित्यांची निवडणूक सहकार खात्याने जाहीर केली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघणार असून, या निवडणुकीत महाविकास आघाडीची मोट बांधली जाणार का, याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

कोरोनाच्या भयंकर लाटेच्या पार्श्वभूमीवर नाशिक बाजार समितीला यापूर्वी दोनवेळेस मुदतवाढ देण्यात आली. ही मुदवाढही प्रत्येक सहा-सहा महिन्यांची होती. मात्र, जिल्ह्यात अजूनही निफाड आणि सिन्नर ही शहरे कोरोनासाठी हॉटस्पॉट ठरत आहेत. येथे रोज मोठ्या संख्येने रुग्ण सापडत आहेत. पुन्हा निवडणूक म्हटला की प्रचार आला. त्यामुळे बाजार समितीच्या संचालकांना मुदतवाढ देण्याची मागणी होत होती. सध्याच्या संचालकांनी जिल्हा उपनिबंध कार्यालायला तसा अर्जही दिला होता. हा अर्ज कार्यालयाने पुढे पणन मंडळाकडे पाठवला. त्यानंतर सहकार व पणन विभागाने एक परिपत्रक काढले. त्यात ज्या कृषी उत्पन्न बाजार समितींची मुदत संपली होती, त्यांना 23 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे कळवण्यात आले होते. पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या कार्यासन अधिकाऱ्यांनी या आदेशच्या प्रती सर्व बाजार समित्यांचे सचिव, सर्व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सर्व विभागीय सहनिबंधक, राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, कृषी आणि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक, पुण्याचे पणन संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या सचिवांना पाठवल्या. त्यामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची होणारी निवडणूक लांबणीवर पडली होती. मात्र, आता कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. तिसरी लाट येण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यात नाशिकसह पिंपळगाव, लासलगाव, नांदगाव, मनमाड, येवला, चांदवड, देवळा, उमराणे, घोटी, कळवण, दिंडोरी, सिन्नर, मालेगाव व सुरगाणा बाजार समितीचा समावेश आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

23 ऑक्टोबर 2021 पर्यंत मुदत संपणाऱ्या बाजार समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी 10 नोव्हेंबर रोजी मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. अंतिम मतदार यादी 6 डिसेंबर रोजी प्रसिद्ध होईल, तर 16 डिसेंबरपासून नामांकनास सुरुवात होईल. उमेदवारांना 7 जानेवारी 2022 पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. तर 17 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. आता या निवडणुका सत्ताधारी महाविकास आघाडी एकत्र येऊन लढणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

येथे होणार निवडणूक

– नाशिक
– पिंपळगाव
– लासलगाव
– नांदगाव
– मनमाड
– येवला
– चांदवड
– देवळा
– उमराणे
– घोटी
– कळवण
– दिंडोरी
– सिन्नर
– मालेगाव
– सुरगाणा

इतर बातम्याः

सांग कुठं ठेवू माथा, कळनाच काही: मंदिर प्रवेशावरून वादाचे मोहोळ; त्र्यंबकेश्वरच्या गर्भगृहात भाविकांना बंदी

लचकंतोड्या पावसाने झोडपले, ढगफुटीसारखी हजेरी; नाशिक जिल्ह्यात द्राक्षबागांसह पिकांचे क्षणात होत्याचे नव्हते!

नाशिकमध्ये पहिल्यांदाच UPSC परीक्षा; आज 3445 विद्यार्थी भविष्य आजमावणार

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI