नाशिकमध्ये पहिल्यांदाच UPSC परीक्षा; आज 3445 विद्यार्थी भविष्य आजमावणार

नाशिकमध्ये पहिल्यांदाच UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) तर्फे नागरी सेवा पूर्व परीक्षा 2021 घेण्यात येत आहे. परीक्षेसाठी शहरातील 10 केंद्रावर 3445 विद्यार्थी आपले भविष्य आजमावणार आहेत.

नाशिकमध्ये पहिल्यांदाच UPSC परीक्षा; आज 3445 विद्यार्थी भविष्य आजमावणार
केंद्रीय लोकसेवा आयोग


नाशिकः नाशिकमध्ये पहिल्यांदाच UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) तर्फे नागरी सेवा पूर्व परीक्षा 2021 घेण्यात येत आहे. परीक्षेसाठी शहरातील 10 केंद्रावर 3445 विद्यार्थी आज रविवारी आपले भविष्य आजमावणार आहेत.

प्रशासनातर्फे UPSC परीक्षेची जोरात तयारी करण्यात आली आहे. त्यासाठी 480 अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आयोगाच्या सूचनेनुसार सर्व केंद्रावर तयारी करण्यात आली आहे. परीक्षेसाठी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परीक्षेत सकाळी 9:30 ते 11:30 या दरम्यान पहिला पेपर, तर तर दुपारी 2:30 ते 4:30 या दरम्यान दुसरा पेपर होणार आहे. यावेळी कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे. शहरातील मराठा हायस्कूलची जुनी आणि नवी इमारत, बिटको हायस्कूल, केव्हीएन नाईक महाविद्यालय, रचना महाविद्यालय, एचपीटी महाविद्यालय या ठिकाणी ही परीक्षा होत आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची परीक्षा समन्वयक आणि महापालिका आयुक्त कैलास जाधव यांची राज्य निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षेदरम्यान जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त सर्व परीक्षा केंद्रांना भेटी देऊन पाहणी करणार आहेत. सोबतच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नियमाचे विद्यार्थी आणि प्रशासनाने काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, यूपीएससी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. या परीक्षेत महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टीमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या तब्बल 9 परीक्षार्थीनींही यावेळी यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. सध्याची कोरोना साथ तसेच ऑनलाईन शिकवणी या सर्व गोष्टींना आत्मसात करत या परीक्षार्थींनी यशाला गवसणी घातली आहे.

बार्टीच्या 9 विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

बार्टी या संस्थेकडून अनुसूचित जातीतील गरीब तसेच होतकरू विद्यार्थ्यांना राज्य सरकारच्या मदतीने स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण दिले जाते. मात्र, सध्याची कोरोनास्थिती तसेच ऑनलाईन शिवकणी यामुळे प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी थोडे विचलित झाले होते. मात्र, हार न मानता या विद्यार्थ्यांनी अभ्यास केला. तसेच बार्टीच्या तब्बल 9 विद्यार्थ्यांनी यूपीएससीच्या परीक्षेत यश संपादन केले. यामध्ये सुहास गाडे (रँक-349),आदित्य जीवने (रँक-399),शरण कांबळे (रँक-542),अजिंक्य विद्यागर (रँक-617),हेतल पगारे (रँक-630), देवरथ मेश्राम (रँक-713),स्वप्नील निसर्गन (रँक-714),शुभम भैसारे (रँक-727) आणि पियुष मडके (रँक-732) या भावी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांचे धनंजय मुंडे यांनी आम्हाला तुमचा अभिमान वाटतो, असे म्हणत अभिनंदन केले आहे.

ही आहेत परीक्षा केंद्रे

– मराठा हायस्कूलची जुनी इमारत
– मराठा हायस्कूल नवी इमारत
– बिटको हायस्कूल
– केव्हीएन नाईक महाविद्यालय
– रचना महाविद्यालय
– एचपीटी महाविद्यालय

इतर बातम्याः

आणखी एक ‘भाविक’ हरपला; नाशिकचे प्रख्यात तबलावादक पंडित विजय हिंगणे यांचे निधन

शिवारतुंबव्या पावसाचे नाशिकमध्ये थैमान; गोडबार छाटणीपूर्वीच द्राक्षबागांवर नांगर, पिकांचा चिखल अन् शेताचे तळे!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI