संबंधांचं कबुलनामा, त्यानंतर धनंजय मुंडेंचं पहिलं ट्विट..पाहा काय म्हणतायत?

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर आज (12 जानेवारी) करुणा शर्मा नावाच्या महिलेसोबतच्या संबंधांची कबुली दिली (Dhananjay Munde first tweet after accept relation with Karuna Sharma)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 21:34 PM, 12 Jan 2021

मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर आज (12 जानेवारी) करुणा शर्मा नावाच्या महिलेसोबतच्या संबंधांची कबुली दिली. त्यांच्या फेसबुकवरील पोस्टनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. खरंतर करुणा शर्मा यांच्या लहाण बहीण रेणू शर्मा यांनी पोलिसात धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार केली. त्यानंतर मुंडे यांनी फेसबुकवर आपली बाजू मांडली. त्यांच्या फेसबुकवरील पोस्टनंतर सोशल मीडिया ते प्रसारमाध्यमांवर विविध चर्चांना उधाण आलं. त्यानंतर या सर्व घडामोडींनंतर म्हणजेच करुणा यांच्यासोबतच्या संबंधाच्या कबुलीनंतर मुंडे यांनी पहिलं ट्विट केलं आहे. विशेष म्हणजे धनंजय मुंडेंनी जी पोस्ट केलीय ती फक्त फेसबूकवर केलीय, ट्विटरवर नाही. त्यानंतर त्यांनी पहिलं ट्विट केलं (Dhananjay Munde first tweet after accept relation with Karuna Sharma).

धनंजय मुंडे यांनी करुणांसोबतच्या संबंधाच्या कबुलनामा नंतर ट्विटरवर पत्रकार महेंद्र महाजन यांच्या ट्विटला प्रतिक्रिया दिली आहे. महाजन यांनी ट्विटमध्ये नाशिकच्या एका विद्यार्थीनीला जात पडताळणीचा दाखला वेळेत मिळाल्याने मुंडेंचे आभार मानले आहेत. त्यावर मुंडेंनी प्रतिक्रिया दिली आहे (Dhananjay Munde first tweet after accept relation with Karuna Sharma).

“कोणत्याही विद्यार्थ्याची जात पडताळणी अभावी शिक्षणाची संधी हुकणार नाही यासाठी महाविकास आघाडी सरकार आणि आमचा सामाजिक न्याय विभाग सदैव तत्पर राहील. प्रवेश मिळालेल्या विद्यार्थिनीला पुढील शिक्षणासाठी खूप शुभेच्छा”, असं धनंजय मुंडे ट्विटरवर म्हणाले.

संबंधित बातम्या :

महाराष्ट्रातील सर्वात मोठा गौप्यस्फोट, करुणासोबत परस्पर सहमतीने संबंधात दोन मुलं, धनंजय मुंडेंची कबुली

1997 मध्ये ओळख झाल्याचा दावा, धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणारी रेणू शर्मा कोण?

धनंजय मुंडेंविरोधातील बलात्काराची तक्रार पोलिसांनी नाकारली; रेणू शर्मा यांचा आरोप, थेट पोलीस आयुक्तांनाच पत्र