‘अंगावरील कातड्याचे जोडे करुन आपल्याला घातले तरी उपकार फिटणार नाहीत’, धनंजय मुंडे भावनाविवश

'अंगावरील कातड्याचे जोडे करुन आपल्याला घातले तरी उपकार फिटणार नाहीत', धनंजय मुंडे भावनाविवश

जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि चाहत्यांनी धनंजय मुंडे यांचं जोरदार स्वागत केलं. कार्यकर्त्यांचं हे प्रेम पाहून मुंडे चांगलेच भावनाविवश झाल्याचं पाहायला मिळालं.

सागर जोशी

|

Jan 26, 2021 | 7:36 PM


बीड : सामाजिक न्यायमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराचा आरोप रेणू शर्मा यांनी मागे घेतला आहे. या आरोपातून मुक्तता झाल्यानंतर धनंजय मुंडे प्रजासत्ताक दिनानिमित्त बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि चाहत्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. कार्यकर्त्यांचं हे प्रेम पाहून धनंजय मुंडे चांगलेच भावनाविवश झाल्याचं पाहायला मिळालं. अंगावरील कातड्याचे जोडे करुन आपल्याला दिले तरी आपल्या उपकाराची परतफेड करता येणार नाही, अशा शब्दात मुंडे यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले.(Dhananjay Munde is emotional while thanking the Party workers)

तुम्हा सर्वांचे आशीर्वाद पाठीशी आहेत. हे आशीर्वाद म्हणजे एखाद्या भगवंताचा प्रसादच आहे. अशा कठीण काळात आपण सर्वजण माझ्या पाठीशी खंबीरपणे राहिलात. त्याबद्दल मी शब्दात आभार व्यक्त करु शकत नाही. अंगावरील कातड्याचे जोडे करुन आपल्याला दिले तरी आपल्या उपकाराची परतफेड करता येणार नाही, अशी भावना मुंडे यांनी व्यक्त केली. आजपर्यंत अनेक संकटाला सामोरा गेलो. सामान्य माणसाच्या मनात स्थान निर्माण करुन आज इथपर्यंत पोहोचलो आहे, असंही मुंडे यावेळी म्हणाले.

‘जिल्ह्याच्या विकासात कमी पडणार नाही’

बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले धनंजय मुंडे आज प्रजासत्ताक दिनानिमित्त बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. ध्वजारोहण पार पडल्यानंतर मुंडे बीडच्या विश्रामगृहात थांबले. त्यावेळी मुंडे यांना भेटण्यासाठी नागरिकांनी नेहमीप्रमाणे तोबा गर्दी केली होती. त्यावेळी नागरिकांच्या प्रश्नांवरुन मुंडे यांनी अधिकाऱ्यांना रस्त्यावरच जाब विचारत फैलावर घेतलं. कामात कुठलीही हयगय नको अशी तंबी मुंडे यांनी अधिकाऱ्यांना दिली. पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर ध्वजारोहण पार पडल्यानंतर पोलीस परेड करत मानवंदना देण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांसह बीडकरांनीही यावेळी मोठी गर्दी केली होती. मुंडे यांनी नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत जिल्ह्याच्या विकासकामात कधीही कमी पडणार नाही, अशी ग्वाही दिली.

धनंजय मुंडेंवर जेसीबीतून फुलांची उधळण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून मुंडे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. शिरुर कासार इथं जेव्हा धनंजय मुंडे दाखल झाले त्यावेळी जेसीबी मशीनमधून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. त्याचबरोबर एक भला मोठा हार क्रेनच्या माध्यमातून त्यांना घालण्यात आला. कार्यकर्त्यांकडून झालेल्या या अभूतपूर्व स्वागतामुळे धनंजय मुंडे भारावल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळालं.

संबंधित बातम्या :

Dhananjay Munde : जेसीबीतून फुलांची उधळण, धनंजय मुंडेंचं जंगी स्वागत

बलात्कार प्रकरण भोवणार?; धनंजय मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीचं नेमकं काय होणार?

Dhananjay Munde is emotional while thanking the Party workers

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें