राज्यात जात प्रमाणपत्र पडताळणीमुळे विद्यार्थ्यांना प्रवेशात अडथळा, धनंजय मुंडेकडून दखल घेत आदेश

आरोप प्रत्यारोपांचा भडिमार, बदना झाल्यानंतरही सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या दैनंदिन कामाला खंड पडू दिलेला नाही.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 20:25 PM, 16 Jan 2021
राज्यात जात प्रमाणपत्र पडताळणीमुळे विद्यार्थ्यांना प्रवेशात अडथळा, धनंजय मुंडेकडून दखल घेत आदेश
धनंजय मुंडे

मुंबई : आरोप प्रत्यारोपांचा भडिमार, बदना झाल्यानंतरही सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या दैनंदिन कामाला खंड पडू दिलेला नाही. त्यांनी या काळातही आपल्या मंत्रालयाशी संबंधित कामाचा सपाटाच लावलाय. त्यांनी रोजच्याप्रमाणे विभागातील आणि बीड जिल्ह्यातील विविध कामकाजात लक्ष घातल्याचंही आढळून आलं. ग्रामपंचायत निवडणूक, विविध शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया यामुळे जातपडताळणी प्रक्रियेवरील ताण वाढताना दिसत आहे. त्यातूनच राज्याच्या विविध भागातून जात प्रमाणपत्र पडताळणी संबंधित तक्रारी प्राप्त होत आहेत. हे समजताच धनंजय मुंडे यांनी या प्रकरणी लक्ष घातलंय (Dhananjay Munde order to relief Students facing problem in Caste Validity).

13, 14 आणि 15 जानेवारी या राजकीय कारकिर्दीतील अत्यंत कसोटीचा काळ ठरलेल्या 3 दिवसातही धनंजय मुंडे यांनी त्यांचे कामकाज सुरुच ठेवले होते. अनेक जिल्ह्यांच्या जात पडताळणी समिती कार्यालयांमध्ये 14 आणि 15 जानेवारी रोजी मोठी गर्दी झाल्याने मुंडेंनी तेथील अधिकाऱ्यांना रात्री उशिरापर्यंत काम करून अर्ज निकाली काढण्याच्या सूचना दिल्या. ऑनलाईन प्रक्रियेमध्ये असलेल्या त्रुटी तातडीने दुरुस्त करून पडताळणी यशस्वी झालेले प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना त्यांच्या इमेलवर वेळेत पाठवले जावे यासाठीही धनंजय मुंडे यांनी बार्टी स्तरावरून आदेश दिले.

‘विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अडचण होऊ नये म्हणून धनंजय मुंडेंचा हस्तक्षेप’

10 वी नंतर डिप्लोमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी जातपडताळणी प्रमाणपत्र वेळेत मिळाले नाही तर अडचण येईल. ही अडचण येऊ नये यासाठीही मुंडेंच्या कार्यालयाने सीईटी विभागाकडून 20 जानेवारीपर्यंत मुदत वाढवून घेतली. याशिवाय या 4 दिवसांमध्ये धनंजय मुंडे हे बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीसही हजर होते. त्याआधी मुंडे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या मुख्यमंत्री रोजगार योजनेच्या बैठकीस उपस्थित राहिले. यावेळी परळी मतदारसंघातील दाखल प्रस्ताव मंजूर करण्याबाबत त्यांनी चर्चा केली. तसेच एकीकडे राजीनामा मागण्यावरून गदारोळ सुरू असताना मुंडेंनी राष्ट्रवादी काँग्रसच्या कार्यालयात जनता दरबारही घेतला आणि लोकांचे प्रश्न सोडवले होते.

‘तरुणाला वैद्यकीय मदत म्हणून तातडीने 50 हजार रुपयांची मदत’

परळी मतदारसंघ आणि बीड जिल्ह्यात आजपासून कोव्हिड लसीकरणास प्रारंभ झाला. जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या तयारीचा आणि प्रत्यक्ष लसीकरणाचा धनंजय मुंडे सातत्याने आढावा घेत आहेत. मतदारसंघातील आणि जिल्ह्यातील नागरिकांसाठी धनंजय मुंडे यांच्यावतीने कोरोना हेल्प सेंटर आणि ऑनलाईन वैद्यकीय मदत कक्ष चालवण्यात येतो. या मदतकक्षाचे कामकाज या प्रसंगात देखील सुरू आहे. परळी तालुक्यातील कन्हेरवाडी येथील सोमेश फड या तरुणाला मुंडेंच्या वैद्यकीय मदत कक्षाने रुग्णालयाच्या खर्चासाठी 50 हजार रुपयांची मदत केली. स्वतः सोमेश फड यांनी मध्यरात्रीच्या वेळी मंजूर देऊन मदत केल्याचं सांगितलं.

मलबार हिल येथील चित्रकूट या मुंडेंच्या शासकीय निवासस्थानावर मतदारसंघ, बीड जिल्हा व राज्यातील त्यांच्या समर्थक, कार्यकर्ते आणि नागरिकांची चांगलीच रेलचेल पाहायला मिळते. या संकटांच्या काळातही भेटायला आलेल्या नागरिकांना धनंजय मुंडे हे त्यांच्या कामाबद्दल विचारपूस करताना दिसले.

हेही वाचा :

मी धनंजय मुंडेंना ओळखत नाही, त्यांच्या मदतीसाठी पुढे येण्याचा संबंध नाही : मनीष धुरी

Dhananjay Munde Case | पोलिसांवर विश्वास, मुंडे प्रकरणाची ते योग्य चौकशी करतील : सुप्रिया सुळे

धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अन्यथा राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयांबाहेर आंदोलन, चंद्रकांत पाटलांचा इशारा

व्हिडीओ पाहा :

Dhananjay Munde order to relief Students facing problem in Caste Validity