AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी आजाराची लागण; करुणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाल्या जेव्हा आम्ही फिरायला गेलो होतो तेव्हा..

अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांची प्रकृती पुन्हा एकदा बिघडली आहे. त्यांना बेल्स पाल्सी नावाचा दुर्मिळ आजार झाला आहे. यावर आता करुणा शर्मा यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी आजाराची लागण; करुणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाल्या जेव्हा आम्ही फिरायला गेलो होतो तेव्हा..
karuna sharma
| Updated on: Feb 20, 2025 | 7:17 PM
Share

अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांची प्रकृती पुन्हा एकदा बिघडली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया झाली होती, त्यानंतर आता त्यांना बेल्स पाल्सी नावाचा दुर्मिळ आजार झाला आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या आजारामुळे त्यांना सलग दोन मिनिटे निट बोलता देखील येत नाही. त्यामुळे आपण कॅबिनेट मिटींग आणि जनता दरबाराला उपस्थित राहिलो नाही असा खुलासा त्यांनी केला आहे. दरम्यान धनंजय मुंडे यांच्या आजारावर आता करुणा शर्मा यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाल्या करुणा शर्मा? 

आधी त्यांना डोळ्याचा आजार  झाला मग त्यांना कुठलातरी आता चायना वरून आलेला बेल्स पाल्सी रोग झाला. नेमकं त्यांना झालंय काय त्यांनाच विचारा, त्यांनी आता आराम करावा. माझी अशी मागणी आहे की, कोणत्याही नेत्याला जर आजार झाला तर त्यांना फाईव्ह स्टार हॉटेल सारख्या रुग्णालयात भरती न करता या सगळ्यांना शासकीय रुग्णालयांमध्ये भरती करावं. जेणेकरून समजेल की यांना खरच काही आजार झालाय का असं करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, बायको म्हणून त्यांनी लवकरात लवकर बरं व्हावं अशाच शुभेच्छा देईल. पण यामध्ये काहीतरी गौड बंगाल वाटतंय, ते आजारपणाचा बहाणा करत असतील असं यामध्ये मला दिसून येत आहे. संतोष देशमुख हत्याकांडानंतर इतके घोटाळ्याचे आरोप झाले की आता लोकांसमोर जाण्यासाठी त्यांच्याकडे तोंड नाहीये, म्हणून आजाराचा बहाणा करत असतील असं मला वाटतं असं करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे.

11 डिसेंबर 2020 रोजी सुद्धा आम्ही फिरण्यासाठी गेलो होतो, तेव्हा आमच्यात भांडण झालं आणि मग ते तिथून मुंबईत पोहोचले आणि रुग्णालयात दाखल झाले, तेव्हा देखील असेच म्हणाले की पोटाचा कुठलातरी आजार झाला आहे, असा खुलासा देखील त्यांनी यावेळी केला. सध्या धनंजय मुंडे यांच्यावर रिलान्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.