AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashwini Paul: मागील तीन महिन्यांपासून ती…राष्ट्रीय कुस्तीपट्टू अश्विनी पौळ यांच्या वडिलांनी सांगितली धक्कादायक माहिती

Ashwini Paul Naldurga Fort: राष्ट्रीय कुस्तीपट्टू अश्विनी पौळ यांनी तीन मुलांसह उडी मारुन आपलं आयुष्य संपवलं. यानंतर या घटनेला अनेक फाटे फुटले आहेत. आता अश्विनी यांच्या वडिलांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Ashwini Paul: मागील तीन महिन्यांपासून ती...राष्ट्रीय कुस्तीपट्टू अश्विनी पौळ यांच्या वडिलांनी सांगितली धक्कादायक माहिती
| Updated on: Sep 04, 2026 | 3:27 PM
Share

Ashwini Paul Naldurg: तुळजापूरमध्ये असलेल्या नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ल्यात गुरुवारी एक ‎धक्कादायक घटना घडलेली पाहायला मिळाली. निलंगा तालुक्यातील पौळ‎ अंबुलगा येथील एमएसएफच्या माजी कर्मचारी अश्विनी ‎मनोहर पौळ या राष्ट्रीय महिला कुस्तीपट्टूने आपल्या तीन मुलांसह ‎‎किल्ल्यातील उपळी बुरुजावरून 100 फुटांवरून उडी मारली. यामध्ये अश्विनी, साडेपाच वर्षांचा मुलगा अजिंक्य यांचा जागीच मृत्यू झाला.  तर अडीच वर्षांची मुलगी क्रांती हीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. अडीच वर्षाची वीरावर सध्या उपचार सुरु आहे. या घटनेनंतर आता अश्विनीच्या माहेरच्यांनी सासरच्यांवर अनेक आरोप केले आहे. तर आता एफआयआरही दाखल केली आहे.

नवरा, सासू आणि सासरे यांच्या जाचाला कंटाळून माझ्या मुलीने हे पाऊल उचलले आहे. सतत फोन करून तिला धमकी द्यायचे, तुला जगू देणार नाही असं ही म्हणायचे. सासरी तिच्यावर खूप प्रेशर होते. आम्ही तिला सतत समजवून सांगत होतो पण सासरची लोक तिला फक्त धमक्या द्यायचे. माहेरी आल्यानंतर देखील फोनवरून तिला सतत टॉर्चर केले जात होते. मागील 8 दिवसात मुलीसोबत काहीतरी घडलं असावं हा संशय देखील वडिलांनी व्यक्त केला आहे. माझी मुलगी तीन महिन्यापासून माझ्याकडेच राहायला होती. आता मी एफआयआर दाखल केली आहे. पोलिस योग्य काय ती कारवाई करतील, असा आरोप अश्विनी पौळ यांनी केला आहे.

अश्विनीचा पती हा रिक्षाचालक आहे. अश्विनीचे वडील तानाजी मोहिते हे शिक्षक आहे. त्यांना कुस्तीचा नादही आहे. त्यांनी लहानपणापासून अश्विनीला कुस्तीचे धडे दिले होते ज्यामुळे ती राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचली आहे. कुस्तीची ‎जिद्द पाहून वडिलांनी तिला घरीच कुस्तीची ‎तालीम तयार करायला लावली.  आता पोलिसांकडे तपास सुरु असून त्यांच्या तपासाकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या असतील.
अश्विनीची कारकिर्द 
आश्विनीने 2007 मध्ये केरळमधील तिरुवनंतपुरम येथे पार पडलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक पटकावले होते, तर 2008 आणि 2009 मध्येही त्यांनी राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुवर्णपदकां मिळवलं होते.

Follow Us
पुण्याच्या पायाभूत सुविधांचा विकास आणि आधुनिक शहर निर्मितीचे फडणवीसांच
पुण्याला वेगवान गतिशीलता असलेलं शहर बनवणार
नागपुरात डीजेच्या आवाजावर पोलीस ॲक्शन मोडवर
नागपुरात डीजेवरील बंदीनंतर पहिली कारवाई
आंदोलक घोड्यावर बसून अंतरवालीत
आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा आंदोलक घोड्यावर बसून अंतरवालीत
बापटांची मराठी ट्रेंडिंग-सीएम फडणवीस
'बापटांची मराठी ट्रेंडिंग,मला ट्यूशनच घ्यावी लागेल'-सीएम फडणवीस
शरद पवारांची भेट, लगेच सुनेत्रा पवारांची भेट! काकडेंच्या दौऱ्याने...
NCP | शरद पवारांची भेट, लगेच सुनेत्रा पवारांची भेट! विक्रम काकडेंच्या दौऱ्याने राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चांना वेग
बोगस SRA फॉर्म भरणं हाच मोदींनी दिलेला रोजगार! ठाकरेंचा भाजपवर घणाघात
Uddhav Thackeray | बोगस SRA फॉर्म भरणं हाच मोदींनी दिलेला रोजगार! उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात
दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! ठाकरेंचं मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray | दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य; राम कदमांचा थेट सवाल
मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक
Delhi | मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक; दिल्लीच्या संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर मोठं आंदोलन
हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...
Vidyanand Bapat | भावना म्हणजे हात-पाय दुखण्यासारख्या नाहीत! हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...
मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! 8 दिवस बंदी
मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! भाजपच्या नगरसेवकांची 8 दिवस बंदीची मागणी; मनसेचा तीव्र विरोध