AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पैसा असो वा नसो; मनाची श्रीमंती हवी! सरकारच्या आधी ‘या’ पालकमंत्र्यानं थेट 12 लाख दिले, ती माऊली म्हणाली.. तुम्ही माझे विठ्ठल झालात…

मनाची श्रीमंती असली की तुमची मदत कोणत्याही स्वरुपात गरजूपर्यंत पोहोचते. मात्र तिथेच दारिद्र्य असेल तर तुमच्याजवळ कितीही पैसा असला तरी फार उपयोग होत नाही.

पैसा असो वा नसो; मनाची श्रीमंती हवी! सरकारच्या आधी 'या' पालकमंत्र्यानं थेट 12 लाख दिले, ती माऊली म्हणाली.. तुम्ही माझे विठ्ठल झालात...
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 14, 2023 | 10:25 AM
Share

संतोष जाधव, धाराशिव : तुमच्याकडे पैसा असो वा नसो. मदतीची वृत्ती असली की कोणत्याही स्वरुपातलं दान आपल्या हातून घडतं. मनाची श्रीमंती हाच खरा दागिना. दातृत्वाची वृत्तीच नसेल तर कितीही पैसा तुमच्याकडे येवो, तो गरजूपर्यंत पोहोचत नाही. ना एखादं पुण्याचं काम तुमच्या हातून होतं… याउलट दातृत्व असेल तर एखाद्याच्या संकटकाळी तुम्ही आपोआप धावून जाता. या कठीण स्थितीत एखाद्याला केलेली थोडीशी मदत एखाद्यासाठी सर्वात मोठी ठरते. आयुष्य बदलवणारी ठरते. अशी व्यक्ती तुम्हाला देवही मानू शकते. धाराशिवचे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनाही एका शेतकरी महिलेनं देवाचीच उपमा दिलीय. तुम्ही माझे विठ्ठल झालात… असे शब्द त्या माऊलीच्या तोंडून निघाले तेव्हा हा प्रसंग अनुभवणारेही भावूक झाले.

सरकारच्या आधी सावंतांची मदत

अवकाळी पावसानं राज्यभरातील शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय. राज्य सरकारचे अधिकारी, कर्मचारी पंचनाम्यात गुंतलेत. पण अद्याप ही प्रक्रिया पूर्ण झाेली नाही. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप राज्य सरकारची नुकसानीची मदत मिळालेली नाही. नुकसानीची पंचनामे व कागदोपत्री प्रक्रिया सुरु आहे. सरकारच्या मदतीची घोषणेची वाट न पाहता मंत्री सावंत यांनी घोषणा केली . स्वतःच्या भैरवनाथ उद्योग समुहाच्या माध्यमातून १२ लाख रुपयांची मदत शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पोहचवली व आधार दिला.

राज्याचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत हे शेतकऱ्यांसाठी कैवारी ठरले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाराशिव जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना भेट दिली, त्या 2 शेतकऱ्यांना डॉ सावंत यांनी 12 लाख रुपयांची नुकसान भरपाई पोटी मदत केली. मंत्री सावंत यांचे पुतणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी मदतीचा चेक शेतकरी यांच्याकडे सुपूर्द केला.

धाराशिव जिल्ह्यात वादळी वारे, गारपीट व अवकाळी पावसाने शेतकऱ्याचे मोठे नुकसान केले. या अवकाळीचा फटका जिल्ह्यातील 71 गावांना बसला. पहिल्या दिवशी झालेल्या पंचनाम्यानुसार, 2 हजार 571 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. तुळजापूर तालुक्यातील मोर्डा व धाराशिव तालुक्यातील वाडी बामणी येथे मुख्यमंत्री शिंदे यांनी भेट देऊन शेतकऱ्यांना आधार दिला. त्यावेळी पालकमंत्री डॉ सावंत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर 2 शेतकऱ्यांना मदत करण्याचे जाहीर केले. यावेळी भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील उपस्थित होते.

मोर्डा या गावातील द्राक्ष बागायतदार सिताबाई सुरवसे यांची पूर्ण द्राक्ष बाग गारपीटने उध्वस्त झाली होती. त्यांना डॉ सावंत यांनी 10 लाख तर वाडी बामणी येथील टरबूज उत्पादक शेतकरी बाबासाहेब उबरदंड यांना 2 लाखांची मदत दिली. शेतकऱ्यांनी मंत्री सावंत यांचे आभार मानले. यावेळी अनिल खोचरे ,दत्ता मोहिते ,गौतम लटके,धनंजय पाटील उपस्थित होते.

सीताबाई सुरवसे या महिनेने फोनवरून मंत्री डॉ तानाजी सावंत यांचे आभार मानले. तुम्ही मुख्यमंत्री यांच्यासमोर दिलेला शब्द पाळला, तुम्ही संकटात असताना धावून आलात, माझे विठ्ठल झालात असे म्हणाल्या.. तर ‘काळजी करू नका, संकटातून उभे राहायचे आहे, मी आहे… काही लागले तर सांगा खचू नका. मुख्यमंत्री तुमच्या पाठीशी आहेत.. अशा शब्दात सावंत यांनी या महिलेला धीर दिला.

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.