धुळे शहरात 12 श्वानांच्या मृत्यूने खळबळ, नागरिकांसह पालिकाही चिंतेत, नंदुरबारमध्येही श्वानांच्या संख्येत वाढ
धुळे शहरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. देवपुरातील इंदिरा गार्डन परिसरातील वर्षा बिल्डिंगजवळ एकाच वेळी 12 श्वानांचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

धुळे शहरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील देवपूर भागात 12 श्वानांचा मृत्यू झाला आहे. देवपुरातील इंदिरा गार्डन परिसरातील वर्षा बिल्डिंगजवळ एकाच वेळी 12 श्वानांचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. या श्वानांच्या मृत्यूचे कारण काय आहे हे अद्याप समोर आलेले नाही. तसेच या श्वानांच्या मृत्यूमुळे नागरिकांना काही धोका तर नाही ना? हेही शोधले जात आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
धुळ्यात 12 श्वानांचा मृत्यू
गेल्या काही काळापासून धुळे शहरात भटक्या श्वानांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. या श्वानांमुळे नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. अशातच आता देवपुरातील इंदिरा गार्डन परिसरातील वर्षा बिल्डिंगजवळ 12 श्वानांचा मृत्यू झाला असल्याने नागरिकांसह पालिका प्रशासनाचीही चिंता वाढली आहे. अनेकदा श्वानांमुळे अपघातही होत असतात. तसेच काही श्वान लहान मुलांवर आणि वृद्ध व्यक्तींवर हल्लाही करत असतात. त्यामुळे श्वानांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी धुळे महापालिका प्रशासनाकडून श्वान निर्बिजीकरण सुरू करण्यात आले आहे.
नंदुरबारमध्येही श्वानांच्या संख्येत वाढ
धुळ्यात श्वानांचा मृत्यू का झाला याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मानवी हस्तक्षेपामुळे या श्वानांचा मृत्यू झाला का हे तपासणे गरजेचे आहे. त्याचबरोबर नंदुरबारमध्येही श्वानांच्या संख्येत वाढ झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. नंदुरबारमध्येही श्वानांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे.
श्वानांमुळे कोणते आजार होतात?
श्वानांमुळे माणसांमध्ये काही संसर्गजन्य आजार होऊ शकतात. सर्वात गंभीर आजार म्हणजे रेबीज, जो कुत्र्याच्या चाव्यामुळे होतो, ज्यामुळे मानवाचा मृत्यू होऊ शकतो. लेप्टोस्पायरोसिस हा आजार कुत्र्यांच्या मूत्रामुळे पसरतो. हायडेटिड रोग परजीवीमुळे होतो आणि यकृत व फुफ्फुसांवर परिणाम करतो. साल्मोनेला आणि स्कॅबीज हे रोगही कुत्र्यांमुळे होऊ शकतात. अशा आजारांपासून बचावासाठी कुत्र्यांचे नियमित लसीकरण, स्वच्छता आणि सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. श्वानाने चावा घेतल्यास तात्काळ वैद्यकीय उपचार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
