मालेगावात कोरोनापाठोपाठ डायरियासदृश्य रुग्णसंख्या वाढली, आरोग्य विभागाच्या चिंतेत वाढ

मालेगाव शहरात कोरोना रुग्णांची संख्या घटत असताना दुसरीकडे डायरियासदृश्य आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.

मालेगावात कोरोनापाठोपाठ डायरियासदृश्य रुग्णसंख्या वाढली, आरोग्य विभागाच्या चिंतेत वाढ
ALI AKBAR HOSPITAL

रईस शेख, टीव्ही 9 मराठी, मालेगाव : मालेगाव शहरात कोरोना रुग्णांची (Corona Patients) संख्या घटत असताना दुसरीकडे डायरियासदृश्य आजाराच्या रुग्णांची (patients with diarrhea-like illness) संख्या वाढत आहे. डायरियामुळे एकाचा मृत्यू झाला असून शेकडो रुग्ण उपचार घेत आहेत. दूषित पाण्यामुळे नागरिकांना जुलाब, वांत्यासारखा त्रास जाणवत आहे. या रुग्णांवर शहरातील महापालिकेच्या वाडिया, अली अकबरसह खासगी रुग्णालयांमध्ये उपचार केले जात आहेत. (diarrhea-like patients has increased In Malegaon after corona in control)

गेल्या तीन दिवसांपासून मालेगावात अचानक जुलाब आणि उलट्या होत असलेले रुग्ण वाढले आहेत. शहारत ठिकठिकाणी अस्वच्छता असून दूषित पाणी पुरवठा होत असल्याने डायरियासदृश आजाराचा त्रास होत उद्भवला आहे. आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे डायरियाचे रुग्ण वाढत असून सर्व दवाखाने भरले असल्याचे रुग्णांनी सांगितले.

याबाबत बोलताना महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. सपना ठाकरे यांनी सांगितले की, शहारत डायरियाचे रुग्ण असून त्यात जुलाब होणारे रुग्ण जास्त आहेत. आता पावसाळा सुरु होणार आहे, त्यामुळे साथीचे आजार सुरू होतील. पावसाळ्यात असे आजार परसरतात, त्यामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. यावेळी ठाकरे यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करत साथीच्या आजारांना आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेतर्फे उपाययोजना केल्या जात असल्याचे सांगितले.

मालेगावात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत असताना डायरियासारख्या साथीच्या आजारांने डोके वर काढल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.

इतर बातम्या

‘माझ्या भाच्याला काही बोलू नको’, बापाचा संतापाचा पारा चढला, थेट मेव्हण्यावर वार, गोंदिया हादरलं!

शारीरिक संबंधाचं शूटिंग, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पुण्यात सहा जणांकडून गँगरेप

‘तो’ हॉटेलमध्ये शिरला, पत्नीला परपुरुषासोबत एका खोलीत रंगेहाथ पकडलं, त्यानंतर….

(diarrhea-like patients has increased In Malegaon after corona in control)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI