AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिशा सालियन प्रकरण : उद्धव मुख्यमंत्री असताना पुरावे नष्ट केले का ? रामदास कदम यांचा सवाल

दिशा सालियन प्रकरणात आता सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांनंतर हा गुन्हा सीबीआयने दाखल केला आहे.आता या प्रकरणात शिवसेना नेते रामदास कदम रामदास कदम यांनी आरोप केले आहेत.

दिशा सालियन प्रकरण : उद्धव मुख्यमंत्री असताना पुरावे नष्ट केले का ? रामदास कदम यांचा सवाल
Aditya Thackeray and Ramdas Kadam
| Edited By: | Updated on: Sep 14, 2026 | 6:22 PM
Share

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आता मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. दिशा सालियन यांच्या वडिलांनी या प्रकरणात शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत. या प्रकरणात आता शिवसेनेचे ( एकनाथ शिंदे ) नेते रामदास कदम यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. काय म्हणालेत रामदास कदम हे वाचूयात…

रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर दिशा सालियन प्रकरणी टीका केली आहे. ते पुढे म्हणतात की सत्यमेव जयते… जय सत्य होतं. आदरणीय न्यायालयाच्या माध्यमातून आता या प्रकरणाला पुढ आला आहे. आदित्य ठाकरे आरोपी आहेत का? मुलीवर बलात्कार झाला आहे का? या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी याप्रकरणात रामदास कदम यांनी केली आहे.

रामदास कदम यांनी या प्रकरणात आरोप करताना म्हणाले की मध्यंतरी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. तेव्हा पुरावे नष्ट करण्याचे काम झाले आहे का? याचा तपास झाला का याची चौकशी देखील झाली पाहिजे असे रामदास कदम यांनी म्हटले आहे.आता तर दिशा सालियन हिच्या वडिलांनीच आदित्य ठाकरे यांचे नाव घेतले असल्याचे रामदास कदम यांनी म्हटले आहे.  न्यायालयाच्या आदेशानुसार आता गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

आदित्य ठाकरे रात्री बारा वाजता कुठे जायचे आणि सकाळी सहा वाजता कोठून यायचे? आदित्य ठाकरे यांचे नाईट लाइफ काय होते ते रात्री कुठे जायचे, असा सवालही रामदास कदम यांनी उपस्थित केला आहे. “बाळासाहेबांनी कमावलं आणि या लोकांनी गमावलं,” अशी टीका रामदास कदम यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावं हीच भूमिका मनोज जरांगे यांची आहे, आता सणासुदीचे दिवस आहेत.पण त्यांनी थोडेसे सबुरीने घ्यावं. आरक्षण देताना ओबीसींवर अन्याय व्हायला नको ही सरकारची भूमिका आहे असे शिवसेना नेते रामदास कदम यांनी म्हटले आहे.

Follow Us
अमित शहा सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, फडणवीस शिंदेही उपस्थित
Lalbag Cha Raja : अमित शहा सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती
मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरी सुरेख डेकोरेशन; सामाजिक संदेश देत केलं बा
मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरी सुरेख डेकोरेशन; सामाजिक संदेश देत केलं बाप्पांचं स्वागत
विनयभंगाच्या तक्रार प्रकरणी शिंदे गटातील आमदार संजय गायकवाडांची मोठी..
विनयभंगाच्या तक्रार प्रकरणी शिंदे गटातील आमदार संजय गायकवाडांची मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाले...
देवेंद्र फडणवीस यांचा राजभाषा दिनी मातृभाषा, भारतीय भाषांच्या गौरव...
देवेंद्र फडणवीस यांचा राजभाषा दिनी मातृभाषा आणि भारतीय भाषांच्या गौरवाचा संदेश