AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोक म्हणतात धंगेकर कर्तृत्वावर जिंकले, मग काँग्रेस धडा कधी घेणार? जल्लोषातही गटबाजी, नाशकात काय घडलं?

एकीकडे रविंद्र धंगेकर यांचा विजय झाल्यानंतर महाविकास आघाडीत एकत्रित निवडणूक लढण्यास विजय निश्चित असल्याचा विश्वास निर्माण झाला आहे. असे असतांना नाशिकमध्ये वेगळं चित्र निर्माण झाले आहे.

लोक म्हणतात धंगेकर कर्तृत्वावर जिंकले, मग काँग्रेस धडा कधी घेणार? जल्लोषातही गटबाजी, नाशकात काय घडलं?
Image Credit source: Google
Updated on: Mar 03, 2023 | 1:54 PM
Share

नाशिक : पुण्यातील कसबा मतदार संघात कॉंग्रेसचे रविंद्र धंगेकर ( Ravindra Dhangekar ) विजयी झाले आहेत. त्यानंतर ठिकठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून विजयी जल्लोष करण्यात आला आहे. त्यामध्ये विजयी जल्लोष केला जात असतांना रविंद्र धंगेकर यांचा हा विजय आहे का ? कॉंग्रेस पक्षाचा विजय आहे ? अशी चर्चा यानिमित्ताने सुरू झाली होती. मात्र याच काळात काही राजकीय विश्लेषक कॉंग्रेसचा विजय नसून रविंद्र धंगेकर यांच्या कर्तुत्वाचा विजय असल्याचे म्हंटले आहे. याशिवाय कॉंग्रेस ( Congress ) पक्षाने यातून धडा घ्यायला हवा असेही बोललं जात असतांना नाशिकमधील कॉंग्रेसमध्ये गटबाजी असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. याशिवाय माजी मंत्र्यांसह पदाढीकऱ्यांनी उघड बंड केल्यानं राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा हॉट आहे.

नाशिकमध्ये कसबा मतदार संघात कॉंग्रेसचे रविंद्र धंगेकर हे विजयी झाल्यानंतर नाशिकमध्ये कॉंग्रेस भवन येथे ठाकरे गटासह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने विजयी जल्लोष करण्यात आला. यावेळी एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला आहे.

मात्र, याच काळात कॉंग्रेसमधील अनेक नेत्यांनी या विजयी जल्लोषाकडे पाठ फिरवत कॉंग्रेसच्या नाराज गटाने शहरातील रेड क्रॉसच्या सिग्नल जवळ फटाके फोडून हा आनंद साजरा केला आहे. मात्र कॉंग्रेस भवन येथे झालेल्या जल्लोषात उपस्थित असलेले पदाधिकारी त्या जल्लोषात सहभागी झालेले नव्हते.

नुकताच नाशिकच्या कॉंग्रेस प्रभारी अध्यक्षपदाचा पदभार आकाश छाजेड यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. हे नेतृत्व मान्य नाही म्हणून माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, प्रदेश कॉँग्रेस उपाध्यक्ष शरद आहेर, प्रदेश प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील, यांच्यासह स्थानिक नेत्यांनी दूसरा जल्लोष केला.

तर कॉंग्रेस भवन येथे नुकतेच कॉंग्रेसचे प्रभारी शहर अध्यक्ष पदी आकाश छाजेड यांच्या उपस्थित झालेल्या जल्लोषात ठाकरे गटासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. याशिवाय कॉंग्रेसमधील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

आकाश छाजेड यांच्या प्रभारी निवडीवरुन कॉंग्रेसमध्ये दोन गट पडलेले आहेत. एकीकडे एकजूट राहिली तर विजय कसा होतो हा आत्मविश्वास आल्याने नाशिकमध्ये संपूर्ण महाविकास आघाडी एकत्रित दिसली आहे.

आगामी काळातील निवडणूक पाहता महाविकास आघाडी एकत्र येऊन निवडणूक लढविण्याचा विचार करत असतांना नाशिकच्या कॉंग्रेसमध्ये उघड नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुण्यातील विजय पाहून आतातरी ही गटबाजी संपुष्टात येईल अशी चर्चा दबक्या आवाजात महाविकास आघाडीत सुरू झाली आहे.

शिवसेनेच्या मंत्र्याची मनसेच्या मोर्चात एन्ट्री अन् काय घडल? बघा VIDEO
शिवसेनेच्या मंत्र्याची मनसेच्या मोर्चात एन्ट्री अन् काय घडल? बघा VIDEO.
ओम फट् स्वाहा...विरोधकांनी गोगावलेंना डिवचल, बघा VIDEO हसू अवरणार नाही
ओम फट् स्वाहा...विरोधकांनी गोगावलेंना डिवचल, बघा VIDEO हसू अवरणार नाही.
महादेव मुंडेंच्या पत्नीचा खळबळजनक आरोप, थेट कराडचं घेतलं नाव अन्...
महादेव मुंडेंच्या पत्नीचा खळबळजनक आरोप, थेट कराडचं घेतलं नाव अन्....
जिथे वडिलांनी लोकप्रतिनिधित्व केलं, तिथेच गवईंचा सत्कार
जिथे वडिलांनी लोकप्रतिनिधित्व केलं, तिथेच गवईंचा सत्कार.
सत्कार सोहळ्यात फडणवीसांकडून सरन्यायाधीश गवईंचे कौतुक
सत्कार सोहळ्यात फडणवीसांकडून सरन्यायाधीश गवईंचे कौतुक.
आम्ही आतंकवादी आहोत की दहशतवादी?पोलिसांच्या कारवाईवर अविनाश जाधव भडकले
आम्ही आतंकवादी आहोत की दहशतवादी?पोलिसांच्या कारवाईवर अविनाश जाधव भडकले.
अविनाश जाधवांची धडाकेबाज एन्ट्री अन् कार्यकर्त्यांचा जल्लोष
अविनाश जाधवांची धडाकेबाज एन्ट्री अन् कार्यकर्त्यांचा जल्लोष.
गोपनीय खात्यात लपवल, मध्यरात्री जे घडल ते अविनाश जाधवांनी सारं सांगितल
गोपनीय खात्यात लपवल, मध्यरात्री जे घडल ते अविनाश जाधवांनी सारं सांगितल.
त्यांना चपलेने मारलं पाहिजे..; राजन विचारेंची सरनाईकांवर आगपाखड
त्यांना चपलेने मारलं पाहिजे..; राजन विचारेंची सरनाईकांवर आगपाखड.
मोठी बातमी; पोलीस नमले, अविनाश जाधवांना सोडलं; बाहेर येताच म्हणाले...
मोठी बातमी; पोलीस नमले, अविनाश जाधवांना सोडलं; बाहेर येताच म्हणाले....