डॉक्टर गाैरी पालवे हिच्या आईचा खळबळजनक खुलासा, थेट म्हणाल्या, आमच्या लेकराने कोणाला..
Gauri Palve Garje Case : पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गर्जे याच्या अडचणीत मोठी वाढ झाली. अनंत गर्जे याच्या पत्नीने आत्महत्या केली. मात्र, गाैरी पालवे गर्जे हिच्या कुटुंबियांनी आत्महत्या नसून ही हत्या असल्याचा दावा केला.

मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे याची पत्नी डॉक्टर गाैरी पालवे गर्जे हिने आत्महत्या केली. मात्र, कुटुंबियांनी गंभीर आरोप करत म्हटले की, ही आत्महत्या नाही तर हत्या आहे. अनंत गर्जे आणि गाैरी यांचे काही महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. लग्नाच्या सुरूवातीचे दिवस व्यवस्थित सर्वकाही सुरू होते. मात्र, घर बदलत असताना गाैरी पालवे हिच्या हाती एक गर्भपाताचा रिपोर्ट लागला. त्या रिपोर्टमध्ये पतीच्या नावे अनंत गर्जे याचे नाव होते. यावरून दोघांमध्ये वाद सुरू होता. गाैरीने याबद्दलची कल्पना आपल्या कुटुंबियांना दिली. तिने अनंतलाही माफ केले होते. मात्र, तो त्या महिलेच्या आताही संपर्कात असल्याचे गाैरीला कळाले आणि वाद वाढले. या वादातूनच तिने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, गाैरी ही लढणारी मुलगी होती, ती आत्महत्या करूच शकत नसल्याचा दावा तिच्या कुटुंबियांनी केला.
गाैरीच्या आत्महत्येनंतर अनंत गर्जे हाच तिला रूग्णालयात घेऊन गेला. मात्र, त्यानंतर तो रूग्णालयातून फरार झाला. गाैरीने आत्महत्या केल्याची माहिती त्याने तिच्या आई वडिलांना दिली. आता नुकताच अंजली दमानिया यांच्यासोबत गाैरी गर्जे हिच्या आई वडिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्री न्याय देतील, असा विश्वास आम्हाला असल्याचे गाैरी पालवे हिच्या कुटुंबियांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर गाैरी पालवे गर्जे हिच्या आईने म्हटले की, आमचे जे काही प्रश्न होते जे सुटत नव्हते. त्याबद्दलची चर्चा आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत केली आहे. त्यांनी आम्हाला पूर्ण सहकार्य करणार असल्याचे सांगून स्वत: लक्ष घालून चाैकशी करून शेवटपर्यंत तुमची साथ देईल, असे त्यांनी म्हटले आणि मला पूर्ण विश्वास आहे की, ते जे बोलले ते करतील.
माझ्या मुलीमध्ये तेवढी शक्ती आणि सहनशक्ती होती की, ज्यावेळी आम्ही तिला म्हटले की घरी ये.. तिला नाही यायचे होते… ती सहन करणारी होती… ती स्वत: चे स्वत: निर्णय घेणारी होती… आम्हाला त्यांना काय म्हणणार ना… आमच्या लेकराने आम्हाला कोणाला काही सांगूच दिले नाही… मागचे काही काढून विषयच नाहीये.. आता पुढे काय करायचे याच्यावर लक्ष द्यावे लागेल.
