डॉक्टर गाैरी पालवे हिचे वडील बोलत असतानाच घडला धक्कादायक प्रकार, आईने थेट हात दाबत…
Doctor Gauri Palve Garje Case : डॉक्टर गाैरी पालवे गर्जे प्रकरणात तिच्या कुटुंबियांकडून गंभीर आरोप केली जात आहेत. पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गर्जेच्या पत्नीने आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली होती. दररोज अनेक खुलासे होताना दिसत आहेत. त्यामध्येच आता माध्यमांसोबत संवाद साधताना असे काही घडले की, त्याची जोरदार चर्चा होत आहे.

मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे याची पत्नी डॉक्टर गाैरी पालवे गर्जे यांनी वरळीतील राहत्या घरी आत्महत्या केली. गाैरीच्या आत्महत्येनंतर कुटुंबियांनी गंभीर आरोप करत ही आत्महत्या नाही तर हत्या असल्याचा दावा केला. गाैरीला रूग्णालयात दाखल केल्यानंतर आरोपी अनंत गर्जे फरार होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केले असता त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली. गाैरी हिच्या अंगावर काही जखमा असल्याचा दावा कुटुंबियांनी केला. अनंत याच्याही अंगावर जखमा असल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले. अनंत गर्जे याच्यासोबतच त्याच्या बहीण आणि भावावर गुन्हा दाखल करण्यात आला. अनंत आणि गाैरीचे काही महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. विशेष म्हणजे हे लग्न अत्यंत थाटात झाले होते. घर बदलत असताना गाैरीला एक गर्भपाताचा रिपोर्ट सापडला. त्या रिपोर्टमध्ये पतीचे नाव म्हणून अनंत गर्जेच्या नावाचा उल्लेख होता.
गर्भपाताचा रिपोर्ट सापडल्यापासून दोघांमध्ये सतत वाद होत होती. गाैरीने याबद्दलची माहिती देखील आपल्या कुटुंबियांना दिली होती. वरळी पोलिसांनी अनंत गर्जेच्या प्रियसीला चाैकशीसाठी बोलावले असता 2022 पासून आपण त्याच्या संपर्कात नसल्याचे तिने स्पष्ट केले. मात्र, गाैरीला संशय होता की, अनंत हा अजूनही तिच्या संपर्कात होता. आता नुकताच अंजली दमानिया आणि गाैरीच्या आई वडिलांनी माध्यमांसोबत संवाद साधला.
अंजली दमानिया यांनी या प्रकरणात मला वाटते की, राजकीय दबाव आहे. पण मला राजकारणात पडायचे नाही, या कुटुंबाला न्याय मिळायला हवा. यावेळी गाैरी हिच्या पोस्टमार्टम रिपोर्टबद्दल तिचे वडील माहिती देत होते. यावेळी मीडियासमोर गाैरीच्या आईने त्यांना खुनावत हात दाबला. यावेळी गाैरीच्या वडिलांनी बोलणे टाळून थेट म्हटले की, काही गोष्टी मी सांगू शकत नाही. पण आई वडील आल्याशिवाय पंचनामाच कसा केला?
यादरम्यान अंजली दमानिया चांगल्याच भडकल्या. त्यांनी गाैरी पालवे हिच्या आईला म्हटले की, तुम्ही बोलणार नसालच तर तसे मला सांगा… परत मी यात पडणार नाही. खरंच बोलायचे असेल तर बोला… हिंमत दाखवून बोला… अंजली दमानिया यांचे बोलणे ऐकूनही गाैरी पालवेची आई शांतच उभी राहिली. यानंतर अंजली दमानिया या तिथून रागाने निघून जाताना दिसल्या. यामुळे आता विविध चर्चांना उधाण आलंय.
